शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:42 IST

सिन्नर : तालुक्यातील सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. नांदूरशिंगोटे उपबाजारात गेल्या आठवड्यापर्यंत ६ ते ७ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. ती आता ३ हजार क्विंटलपर्यंत आली आहे. आवक निम्म्यावर घसरली आहे. असे असले तरी दरात सुधारणा होण्याची सूतराम शक्यता नसल्याचेच रोजच्या लिलावावरून दिसून येत आहे.

सिन्नर : तालुक्यातील सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. नांदूरशिंगोटे उपबाजारात गेल्या आठवड्यापर्यंत ६ ते ७ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. ती आता ३ हजार क्विंटलपर्यंत आली आहे. आवक निम्म्यावर घसरली आहे. असे असले तरी दरात सुधारणा होण्याची सूतराम शक्यता नसल्याचेच रोजच्या लिलावावरून दिसून येत आहे.नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात गोणी कांद्याचे लिलाव होतात. उन्हाळ कांद्याच्या भावात समाधानकारक वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदाचाळीत मालाची साठवणूक करण्यास पसंती दिल्याचे चित्र आहे. परिणामी सिन्नरला कमाल ९२५ रुपये क्विंटलने कांद्याची खरेदी व्यापाऱ्यांकडून केली गेली असली तरी सरासरी मात्र अवघा ८०० रुपये क्विंटलचा दर शेतकºयांच्या हातात पडत आहे. तर नांदूरशिंगोटेत गोणीला ११५१ रुपये तर सरासरी ९०० रुपये भाव मिळाला. पांढुर्लीतही गोणी कांद्याची आवक निम्म्यावर आली आहे. सिन्नर, दोडी आणि नायगाव उपबाजारातही अशीच गत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात कांद्याने मेटाकुटीस आणले आहे. अत्यल्प दरामुळे उत्पादन खर्चही भरून न निघाल्याने शेतकºयांना कांदा विक्रीस आणताना वाहनांचे भाडे देणेही परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांनी कांदा उकिरड्यावर फेकून दिला. यंदा मात्र उन्हाळ कांद्याला दर मिळण्याची शेतकºयांची अपेक्षा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी मागील वर्षाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी यंदा कांदा साठवणुकीस पसंती दिली आहे. आधुनिक कांदा चाळी उभारून शेतकºयांनी त्यात माल साठविला आहे.