शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली दबल्याने शेतकरी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:06 IST

पिळकोस : शेतातून ट्रॅक्टरने कांद्याची शेवटची ट्रिप घरी नेत असताना उताराला ट्रॉलीचा हुक तुटून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. त्यात गोरख शिवाजी जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देडोक्याला गंभीर मार लागल्याने गोरख यांचा मृत्यू

पिळकोस : शेतातून ट्रॅक्टरने कांद्याची शेवटची ट्रिप घरी नेत असताना उताराला ट्रॉलीचा हुक तुटून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. त्यात गोरख शिवाजी जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.गोरख अल्पभूधारक शेतकरी असून, स्वत:च्या शेतीव्यतिरिक्त दुसºया शेतकºयाची शेती करतात. बुधवारी वाट्याने करत असलेल्या गव्हाळी शिवारातील शेतातील कांदा घरी वाहत असताना गिरणा नदीकाठच्या कसाड शिवारातून कांद्याने भरलेला ट्रॅक्टर घरी घेऊन जात असताना उताराला ट्रॉलीचा हुक तुटल्याने टॅÑक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर खाली आला. त्यामुळे डोक्याला गंभीर मार लागल्याने गोरख यांचा मृत्यू झाला.गोरख जाधव यांचा मोठा मुलगा आर्मीत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर.एस. सोनजे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगन्नाथ सोनजे करीत आहेत.सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घरी जाताना सदर घटना घडली. त्यावेळी पत्नी व मुलगा मोटारसायकलने जात होते. त्यांनी आरडाओरड केली असता शेजारील शेतकरी दीपक जाधव व समाधान आहेर यांनी धाव घेतली. गोरख जाधव यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून त्यांच्यावर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.