शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने फिरविला कोबीवर ट्रॅक्टर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:27 IST

नांदूरवैद्य : सध्या कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने नाशिक तालुक्यातील अनेक शेतकºयांचा कोबी, टमाटे, फ्लॉवर आदी माल कवडीमोल दर मिळत असल्यामुळे शेतातच पडून आहे. याच पार्श्वभूमीवर लोहशिंगवे येथील सुनील जैन या शेतकºयाने दर मिळत नसल्याने आपल्या शेतातील एक एकर कोबीवर ट्रॅक्टर फिरवित पीक भुईसपाट केले.

नांदूरवैद्य : सध्या कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने नाशिक तालुक्यातील अनेक शेतकºयांचा कोबी, टमाटे, फ्लॉवर आदी माल कवडीमोल दर मिळत असल्यामुळे शेतातच पडून आहे. याच पार्श्वभूमीवर लोहशिंगवे येथील सुनील जैन या शेतकºयाने दर मिळत नसल्याने आपल्या शेतातील एक एकर कोबीवर ट्रॅक्टर फिरवित पीक भुईसपाट केले.यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरींना पाणी उपलब्ध होते, मात्र आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम वाया गेला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या परिसरात अनेक शेतकºयांनी भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले, मात्र या भाजीपाल्याला बाजारात कवडीमोल किंमत मिळत असल्याने पिकांसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.या परिसरातील शेतकºयांनी बियाणे, कीटकनाशके तसेच मजूरांवर हजारो रुपये खर्च केला असून, या भाजीपाल्याला दर मिळत नसल्यामुळे लोहशिंगवे येथील सुनीलजैन या शेतकºयाने मेटाकुटीला येत एक एकर शेतामध्ये विक्र ीसआलेल्या कोबीच्या शेतीत ट्रॅक्टरद्वारे रोटोव्हेटर फिरवत कोबी भुईसपाट केली आहे.शेतीला भांडवल व चार पैसे हातात मिळावे म्हणून शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला असतानाही शेतकºयांनी उधार उसनवारी करीत प्रसंगी कारभारणीचे सौभाग्याचे लेणे बॅँक, पतपेढ्या तसेच सावकाराकडे गहाण ठेवून भांडवल उपलब्ध करीत उत्तम प्रतीचा भाजीपाला पिकविला, मात्र त्या भाजीपाल्याला योग्य तो दर मिळत नसल्यामुळे बियाणे, औषधे तसेच घेतलेले कर्ज या लॉकडाउनमुळे कसे चुकवायचे असा प्रश्न परिसरातील शेतकºयांसमोर उभा टाकला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक