चांदवड : तालुक्यातील देवरगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने १२ जागांवर विजय मिळविला. एक उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आला आहे. विरोधी नम्रता पॅनलला पराभव स्वीकारावा लागला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.एन. दवते यांनी काम पाहिल. निकाल घोषित होताच शेतकरी पॅलनच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. गटा-तटाचे राजकारण न करता सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय सोसायटीत घेतले जातील, असे आश्वासन यावेळी बोलताना पॅनलचे नेते डॉ. दिलीप शिंदे, व शंकर शिंदे यांनी दिले. यावेळी केशव शिंदे, सुकदेव मोरे, बबन क्षीरसागर, नबू शिंदे, रफीक शिंदे, पोपट जाधव आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. पराभूत नम्रता पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे-सर्वसाधारण गट- चंद्रशेखर कुरणे (१५९), रंगनाथ शिंदे (१५७), बाबासाहेब शिंदे (१३०), रावसाहेब शिंदे (१३०), इतर मागासवर्ग- रंगनाथ शिंदे (१३९), महिला राखीव गट- इंदूबाई शिंदे (१५०), संगीता चांडक (१३३), अनु. जाती- सीताराम माळी (१७०) व अपक्ष उमेदवार- नारायण शिंदे (३८). (वार्ताहर)
देवरगाव सोसायटी निवडणुकीत शेतकरी पॅनल विजयी
By admin | Updated: June 30, 2016 00:38 IST