शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावच्या बाजार समितीत पुन्हा शेतकऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST

याबत अधिक माहिती अशी की, मौजे कुर्णुली येथील शेतकरी अभिजीत संधान हे टोमॅटोची पावती घेण्यासाठी व्यापारी आडतदाराकडे गेले ...

याबत अधिक माहिती अशी की, मौजे कुर्णुली येथील शेतकरी अभिजीत संधान हे टोमॅटोची पावती घेण्यासाठी व्यापारी आडतदाराकडे गेले असता विचारपूस न करताना शेतकऱ्याला सदर व्यापाऱ्याने मारहाण केली. या शेतकरी मारहाणी प्रकरणी शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बाजार समिती प्रशासनाने योग्य दखल घेऊन सदर कंपनीचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात यावा तसेच शेतकऱ्याला मारहाण होऊन देखील बाजार समितीने दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक होऊन बाजार समिती शासन व प्रशासकीय विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ बोराडे, निफाड तालुका प्रमुख राम राजोळे, निवृत्ती गारे, सुधाकर मोगल, भाऊसाहेब तासकर, गजानन घोटेकर यांनी दिला आहे.

कोट....

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण झाल्याची ही दुसरी घटना आहे. यावेळेस शेतकऱ्याला मारहाण करूनदेखील बाजार समितीने कोणतीही दखल घेतली नाही. बाजार समिती प्रशासनाने वेळीच योग्य भूमिका निभावत सदर व्यापाऱ्याचा परवाना रद्द करावा.

- सोमनाथ बोराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना

..................................

व्यापारी व आमच्यात दहा कॅरेटवरून शाब्दिक वाद झाला होता मात्र ती किरकोळ वाद झाला होता. तो मिटला देखील होता. मात्र दुसऱ्या दिवशी मी टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी गेलो असता आडतदार कंपनीने देण्यास नकार दिला. मी माझ्या कष्टाचे पैसे मागत होतो मात्र त्यांनी ते न देता मला मारहाण केली. सदर आडतदार कंपनीचा परवाना रद्द व्हावा.

- अभिजित संधान, टोमॅटो उत्पादक शेतकरी

फोटो- ०९ पिंपळगाव फार्मर

शेतकरी मारहाणप्रकरणी बाजार समिती प्रशासनाला निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

090921\09nsk_24_09092021_13.jpg

फोटो- ०९ पिंपळगाव फार्मर शेतकरी मारहाणप्रकरणी बाजार समिती प्रशासनाला निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.