शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निऱ्हाळे शिवारात ‘गांजाची शेती’

By admin | Updated: October 28, 2015 23:23 IST

कारवाई : वावी पोलिसांचा छापा; झाडे केली जप्त

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निऱ्हाळे शिवारात एका शेतकऱ्याने ठिबक सिंचनाद्वारे चक्क गांजाची शेती फुलवली असल्याचा प्रकार उघडकीस आला. वावी पोलिसांनी या गांजाच्या शेतीवर छापा टाकून रात्री उशिरापर्यंत गांजाची झाडे मोजून पंचनामा करण्याची कारवाई सुरू केली होती. राजस्व अभियानातून घोटेवाडी-निऱ्हाळे हा शिवरस्ता खुला करण्यासाठी सिन्नरचे तहसीलदार मनोजकुमार खैरनार, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील व अन्य शासकीय अधिकारी व कर्मचारी गेले होते. शिवरस्ता खुला झाल्यानंतर एका खबऱ्याने निऱ्हाळे शिवारातच गांजाची शेती असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील यांना दिली. पाटील यांच्यासह उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, हवालदार रामदास धुमाळ, हनुमंत कांबळे, एस.व्ही. शिंदे यांनी जवळच असणाऱ्या शेतात जावून पाहणी केली. यावेळी पोलिसांना शेतात बहरलेली गांजाची मोठी झाडे दिसून आली. पोलिसांनी तपासणी केल्यानंतर सदर झाडे गांजाचीच असल्याची खात्री पटली. निऱ्हाळे शिवारातील एकनाथ भीमाजी पठारे याने त्याच्या शेतीचा गट क्रमांक ३५७ मध्ये गांजाची शेती केल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सदर गांजाची झाडे तोडून जप्त करण्याचे काम सुरु केले होते. रात्री आठ वाजेपर्यंत पोलिसांनी गांजाची सुमारे ७१ झाडे तोडून जप्त केली होती. सिन्नरचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, निऱ्हाळेचे पोलीस पाटील शिवाजी शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी संशयित आरोपी एकनाथ पठारे यास ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुंगीकारक औषधे, मनोविकार पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली. (वार्ताहर)