शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

सुरगाणा तालुक्यात बंधारा फुटल्याने शेतीचे नुकसान

By admin | Updated: July 31, 2014 00:48 IST

सुरगाणा तालुक्यात बंधारा फुटल्याने शेतीचे नुकसान

सुरगाणा : तालुक्यात मागील चार दिवसांपासून संततधार सुरूच असून, घाटमाथा परिसरात मुसळधार वृष्टी झाल्याने आज सकाळी १० वाजेच्या सुमारास पांगारबारी गावाजवळ हिरमाळ शिवारात चार वर्षांपूर्वी बांधलेला बंधारा फुटल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रविवारपासून सुरू झालेला पाऊस अजूनही थांबला नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, जोरदार वृष्टीमुळे तालुक्यात घाटमाथ्यावरील बोरगाव येथे सर्वाधिक ९२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे घाटमाथ्यावरील पांगारबारी गावाजवळील हिरमाळ शिवारातील चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला बंधारा फुटला. त्यामुळे आलेल्या पुरात काशीनाथ काळू बोंबले व गंगाराम काळू बोंबले या दोन्ही भावांची भातशेती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. आणखी कुणाकुणाच्या शेतीचे नुकसान झाले आहे काय याबाबत तूर्तास माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, अद्यापही पावसाची संततधार सुरूच असून, आज सर्वाधिक पावसाची नोंद बोरगाव येथे ९२ मि.मी. तर त्या खालोखाल सुरगाणा येथे ७१.५ मि.मी., मनखेड येथे ५७.७ मि.मी., बाऱ्हे येथे ५६.५ मि.मी. आणि उंबरठाण येथे ३८ मि.मी. याप्रमाणे झाली. जोरदार पावसामुळे तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे भरले असून, नदी-नाले, ओहोळांना पूर आले, तर काही ठिकाणी फरशी पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. सापुतारा घाटात दरड कोसळल्याने सुरागाणामार्गे गुजराथकडे वाहतूक सुरू होती. पाऊस सुरू झाल्यापासून ३० जुलैपर्यंत तालुक्यातील पावसाची एकूण सरासरी ४४१.८०८ मि.मी. एवढी झाली आहे. गतवर्षी आजच्याच दिवसापर्यंत सुरगाणा येथील एकूण पावसाचीनोंद १०१५ मि.मी. झाली होती. (वार्ताहर)