लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केंद्रात बरे झालेल्या पाच रुग्णांना शनिवारी टाळ्या वाजवत, गुलाब पुष्प देऊन निरोप देण्यात आला.लासलगाव रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे, डॉ. अविनाश पाटील, मुख्य परिचारिका श्रीमती जाधव, पाटेकर, कोळी, दिवेकर, औषध विभागप्रमुख अंकुश काळे, दिलीप जेऊघाले, ज्ञानेश्वर शिंदे, दत्तू शिंदे, राजू जाधव, गणेश भवर, कापसे, संतोष माठा आदी उपस्थित होते.कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर लासलगाव येथील कोरडा उपचार केंद्र परत कार्यान्वित करण्यात आले असून आत्तापर्यंत रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहेत. बहुतांशी रुग्ण बरे झाले असून सध्या एकतीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व सात रुग्ण दगावले आहेत, असे डॉ. अहिरे यांनी सांगितले.
लासलगावच्या पाच रुग्णांना गुलाब पुष्प देऊन निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:16 IST
लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केंद्रात बरे झालेल्या पाच रुग्णांना शनिवारी टाळ्या वाजवत, गुलाब पुष्प देऊन निरोप देण्यात आला.
लासलगावच्या पाच रुग्णांना गुलाब पुष्प देऊन निरोप
ठळक मुद्दे कोरडा उपचार केंद्र परत कार्यान्वित करण्यात आले