शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

फांगदर शाळा भरणार मंगळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:05 IST

खामखेडा : विमानात बसुन विध्यार्थ्यांना गगनाची सैर करून आणलेल्या जिल्हा परिषदेच्या फांगदर (ता. देवळा) शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा थेट ‘मंगळ’ ग्रहावर भरणार आहे. शिक्षक खंडु मोरे यांनी नुकतीच त्यासाठीची शाळा, शिक्षकांसह विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी केली होती. त्याचे नुकतेच बोर्डिंग पास देखील आले आहेत.

ठळक मुद्देशाळा, शिक्षकांसह विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी केली होती

खामखेडा : विमानात बसुन विध्यार्थ्यांना गगनाची सैर करून आणलेल्या जिल्हा परिषदेच्या फांगदर (ता. देवळा) शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा थेट ‘मंगळ’ ग्रहावर भरणार आहे. शिक्षक खंडु मोरे यांनी नुकतीच त्यासाठीची शाळा, शिक्षकांसह विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी केली होती. त्याचे नुकतेच बोर्डिंग पास देखील आले आहेत.हे वाचुन बुचकुळ्यात पडलात ना....... तर ‘नासा’ या जगविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे अंतरिक्षयान ‘लाला ग्रह’ म्हणून ओळखल्या जाणाºया मंगळावर झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसºया ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. ही मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम राबवत आहेत.त्याअंतर्गत फांगदरच्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व शाळेचेही नावे या उपक्रमासाठी नोंदवले होते. त्याचे आॅनलाईन बोर्डिंग पास नुकतेच मिळाले असुन या बोर्डिंग पासचे वाटप शाळेत करण्यात आले.नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या (जेबीएल) मायक्र ोडिव्हायसेस लॅबोरेटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिप वर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या (७५ नॅनोमिटर) रुंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील. ह्या चिप रोव्हर वर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जाणार आहेत.विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना या नव्या क्षेत्राची प्राथमिक माहिती व्हावी, तसेच या उपक्र माच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या चिमुकल्यानी नावे मंगळावर पाठवण्याची संधी मिळाल्याने आनंद होत असल्याचे शिक्षक संजय गुंजाळ यांनी सांगितले.रोव्हर २०२० हे यान‘अ‍ॅटलस ५४१ या रॉकेटच्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून १७ जुलै २०२० ते ५ आॅगस्ट २०२० मध्ये लॉँच केले जाणार आहे. जे २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहचण्याची शक्यता आहे.चौकट...या उपक्र माच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नासा ही अवकाश संशोधन क्षेत्रात काम करणारी संस्था, मंगळ ग्रह त्या ग्रहावरची नासाची चालू असलेली मोहीम आणि पाठवले जाणारे रोव्हर २०२० हे अवकाशयान यांची माहिती मिळेल.- सुनिता धनगर, गटशिक्षण अधिकारी, देवळा.