शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सातबाराच्या नोंदीवरून कौटुंबिक बखेडा

By admin | Updated: August 2, 2016 02:27 IST

कायदेशीर पेच : जागा मालकांचीही अभियानाकडे पाठ

नाशिक : महसूल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या महाराजस्व अभियानाबाबत राज्य सरकार व पर्यायाने जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या ‘लक्ष्मीमूर्ती’ योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागातील घराघरांत तंटा उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, या योजनेंतर्गत सातबारा उताऱ्यावर पुरुषाबरोबर महिलांचेही नाव लावण्याच्या शासनाच्या फतव्याची अंमलबजावणी करण्यात खुद्द शासकीय यंत्रणेलाही कायदेशीर अडथळ्यांचा सामना करावा लागणार असल्याने जागा मालकांनीही या अभियानाकडे पाठ फिरविली आहे. सोमवार १ आॅगस्टपासून राज्यात महाराजस्व अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने सातबारा उताऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रियांच्याही मालकी हक्काची नोंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे त्याचबरोबर वारस नोंदी करताना कुटुंबातील महिला वारसदारांची नावे वगळली गेली असल्यास त्यांची नव्याने वारस नोंद करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त शासन हे अभियान राबवित असले तरी, त्यातून चांगले निष्पन्न होण्याऐवजी कौटुंबिक भांडणेच चव्हाट्यावर येण्याची भीती शासकीय यंत्रणा व्यक्त करीत आहेत. मुळात तलाठी असो वा मंडल अधिकारी हे फक्त नोंदी घेणारे महसूल अधिकारी असून, त्यांना स्वत:हून कोणाच्याही सातबारा उताऱ्यावर कोणाचीही नोंद घेण्याचे अधिकार नाहीत. मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावर पुरुषाबरोबर महिलेचे नाव तलाठी व मंडल अधिकारी स्वत:हून लावू शकत नाही, त्यासाठी त्याला मूळ जागा मालकाची संमती आवश्यक असून, तसा अर्ज केल्याशिवाय ही प्रक्रिया कायदेशीर होऊ शकत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवाय एखाद्या मालमत्तेचा न्यायालयात वाद सुरू असल्यास किंवा एका पुरुषाला दोन बायका असल्यास अशा परिस्थितीत नेमके कोणाचे नाव लावावे, असा प्रश्नही त्यानिमित्ताने उभा राहण्याची शक्यता आहे. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मालमत्तेवर नाव लावण्याची शासनाला अपेक्षा असेल तर, प्रत्येक मालमत्तेच्या मालकाच्या बायकांच्या नावांचा शोध घ्यावा लागणार आहे. मालमत्तेचा मालकी हक्क ठरविण्याचा अधिकार फक्त दिवाणी न्यायालयाला असून, बऱ्याच प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या आदेशान्वयेच मालमत्तेतील नावे वगळण्याचा अथवा समाविष्ट केले जात असल्याने ज्या मालमत्तेमधून यापूर्वीच महिलांची नावे वगळली गेली असतील त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याच्या महाराजस्व अभियानातील मोहिमेमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.