शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वेळ दिल्यास वाढेल कौटुंबिक सुसंवाद

By admin | Updated: July 30, 2014 00:23 IST

पालक दिन : ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ चर्चासत्रातील सूर

नाशिक : पालक व मुलांनी एकमेकांच्या भावनांना समजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ देणे आवश्यक असून, यामुळे कौटुंबिक सुसंवाद उत्तरोत्तर विकसित होण्यास मदत होईल, असा सूर पालक-मुलांच्या खुल्या चर्चासत्रामधून उमटला.निमित्त होते, जैन सोशल ग्रुपच्या वतीने गंगापूररोड येथील शंकराचार्य सभागृहात आयोजित ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या अनोख्या खुल्या चर्चासत्राचे. यावेळी मुलांनी व पालकांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. दरम्यान, मुलांनीदेखील पालकांविषयीचे विविध कमकुवत पैलू मांडले, तसेच पालकांनीदेखील मुलांच्या वाढत्या काही अमर्याद सवयींकडे लक्ष वेधले. यावेळी पालकांकडून फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंगचा वाढता वापर, फास्ट फूडवर वाढते प्रेम, फॅशनचा मोह, फन लव्हिंग नेचर अशा गोष्टींकडे मुले वाहवत चालल्याचे सागंण्यात आले, तर मुलांनी पालकांकडून संभाषणाकडे केले जाणारे दुर्लक्ष, इतर मुलांसोबत केली जाणारी तुलना, आत्मविश्वास विकसित करण्याकडे केले जाणारे दुर्लक्ष आदि बाबींविषयीची खंत व्यक्त केली. गीता परिवाराचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी पालक-मुलांमधील चर्चेवर विस्तृतपणे मत मांडले. यावेळी मालपाणी म्हणाले, पालकांनी मुलांसाठी व मुलांनी पालकांसाठी जाणीवपूर्वक वेळ देणे गरजेचे आहे. मुलांनी आपल्या सोशल नेटवर्किंगच्या वापरावर तसेच फास्ट फूडच्या मोहावर मर्यादा घालणे गरजेचे आहे. पालकांनी ममत्वाबरोबर समत्व साधण्याचा प्रयत्न केल्यास कौटुंबिक संवाद अधिक विकसित होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी अध्यक्ष सचिन गांग, हर्षवर्धन गांधी, अजय ब्रह्मेचा, प्रणय संचेती आदि व्यासपीठावर उपस्थित होते. प्रफुल्ल बरडिया, प्राजक्त मेहता यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)