शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली गावात टोळक्याकडून कुटुंबाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

नाशिकरोड : येथील देवळालीगाव वडारवाडी येथे युवकाच्या हातातील पैसे हिसकावून त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांना लाकडी दांडक्याने मारहाण करून दहशत निर्माण ...

नाशिकरोड : येथील देवळालीगाव वडारवाडी येथे युवकाच्या हातातील पैसे हिसकावून त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांना लाकडी दांडक्याने मारहाण करून दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडारवाडी येथील मनोज सतीश सकट याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तो गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काम आटोपून रस्त्याने पायी घरी जात असताना कुस्ती मैदानाजवळ अर्जुन ऊर्फ गुड्डू रुंजा पवार, राहुल चंदू पवार (दोघे, रा. वडारवाडी) यांनी मनोजला अडवून त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मनोजने घरी जाऊन कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर वडारवाडी चौकात उभ्या असलेल्या अर्जुन पवार याला विचारणा करण्यासाठी मनोजचे नातेवाईक गेले. यावेळी राहुल चंदू पवार, शाम रुंजा पवार, कैलास रुंजा पवार, काशिनाथ रुंजा पवार, चंदू पवार यांनी हातातील लाकडी दांडके, काठ्यांच्या साहाय्याने मनोजचे भाऊ, वडील, बहीण, आदींना बेदम मारहाण करून जखमी करीत जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर जखमी सकट कुटुंब उपचारांसाठी बिटको रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान, वडारवाडी येथून गाडीवर जाणारा दीपक दिनेश फाजगे यालादेखील राहुल रुंजा पवार याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.