शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

कर चुकविण्यासाठी बनावट परवाने

By admin | Updated: September 12, 2014 00:53 IST

कर चुकविण्यासाठी बनावट परवाने

नाशिक : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीने एकाच परवान्यावर दोन बसेसवर सारखेच क्रमांक टाकून प्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) कर चुकवेगिरी केल्याची बाब शहर वाहतूक विभागाने उघडकीस आणली असून, सारख्याच क्रमांकाच्या चार बसेस ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी साईनाथ ट्रॅव्हल्स कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन असाच प्रकार अन्य ट्रॅव्हल्स कंपन्याही करीत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेसला आरटीओकडून अनुमती देताना दरवर्षी २८ हजार रुपये कर आकारणी केली जाते, ही बाब हेरून द्वारका भागातील साईनाथ ट्रॅव्हल्स कंपनीने एकाच बसची आरटीओकडे नोंदणी करून एकाच क्रमांकाच्या दोन बसेससाठी हा परवाना वापरात आणण्याची युक्ती शोधून काढली. त्यात प्रामुख्याने एमएच १५ एके १३०० व एमपी ०७ पी-१३०० या बसेसचा समावेश आहे. या संदर्भातील माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश पाटील, दुय्यम निरीक्षक श्रीमनवार, हवालदार शेळके, मनियार आदिंनी साईनाथ ट्रॅव्हल्सच्या सारख्याच क्रमांकाच्या बसेसचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, औरंगाबादरोडवरील चौधरी यात्रा कंपनीच्या बस डेपोमध्ये एक बस सापडली, तर दुसरी बस साईनाथ ट्रॅव्हल्सच्या पाठीमागे उभी होती. ब्रह्मा व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी एक बस देण्यात आल्याची, तर चौथी बस सिन्नरला असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून क्रेनच्या साह्याने या बसेस ताब्यात घेतल्या. त्यावेळी ट्रॅव्हल्स चालकाने सारख्याच क्रमांकाच्या बसेसच्या नंबरप्लेटमध्ये खाडाखोड करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका बसमध्ये डाळिंबाचे ६३ कॅरेट भरलेले आढळून आले व त्या बसवर संदीप फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेचे नाव होते. ही बसही ट्रॅव्हल्स चालकाने संदीप फाउंडेशनला भाड्याने दिली होती. शहरात अशा प्रकारे पहिलाच प्रकार उघडकीस आल्याने पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी ट्रॅव्हल्स चालक श्रीकांत श्रीराम मंत्री (रा. नाशिकरोड) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने आरटीओचा रस्ता वाहतूक कर चुकविण्यासाठी हा सारा उद्योग केल्याची कबुली दिली. गेल्या चार ते पाच वर्षांपासून एकाच क्रमांकावर दोन व त्यापेक्षा अधिक बसचा वापर खासगी प्रवासी वाहतुकीसाठी केला जात होता. (प्रतिनिधी)