शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

येवल्यात कांदा भावात घसरण

By admin | Updated: April 14, 2016 23:09 IST

दुष्काळात तेरावा : खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतातुर

 येवला : बाजार समितीत कांद्याचे भाव ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल असून, गेल्या महिन्याभरापासून आवक वाढत असल्याने भाव आणखी १०० ते १५० रुपयांनी घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी नाही म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी ठेका पद्धतीने अन्य तालुक्यात कांदा लागवडीसाठी गेलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आता खर्च तर करून बसलो; परंतु भाव घसरत असल्याने हाती धुपाटणे घेण्याची वेळ आली आल्याची प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत. कांद्याचे भाव घसरत असताना आता शेतकरी शासनाला जाब विचारू लागला आहे. कृषिमूल्य आयोगाची भाव ठरवण्याची पद्धती कांद्याच्या बाबतीत का मूग गिळून बसते, असा सवाल आता विचारत आहेत. शेतकऱ्यांचा कांदा वाढला की, हाकाटी पिटली जाते; पण तोच कांदा उत्पादन खर्च फिटत नसताना शेतकऱ्यांना विकावा लागतो. याबाबत मात्र केंद्रशासन काहीच बोलत नाही. ही वस्तुस्थिती आहे. अच्छे दिन येण्यासाठी उचललेले पाऊल चुकले की काय? अशीदेखील विचारणा करू लागली आहे. येवला तालुका दुष्काळी असल्याने पाणी नाही म्हणून कांद्याचे पीक घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी, कोपरगाव, गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण, शिरपूरसह अन्य ठिकाणी २५ ते ३० हजार रुपये ठेक्याने कांदा लागवड करण्यासाठी कुटुंबांसह गेले आहे. काही शेतकरी तिसरा वाटा पद्धतीने ही अन्य ठिकाणी कांदा पीक घेतले आहे. परंतु कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने आगीतून फुफाट्यात पडल्याची परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे. (वार्ताहर)