शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

फळांची आवक घटली, रुग्णांचे हाल

By admin | Updated: June 3, 2017 00:36 IST

नाशिक : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा नाशिकच्या बाजारपेठेवरही विपरीत परिणाम बघायला मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा नाशिकच्या बाजारपेठेवरही विपरीत परिणाम बघायला मिळाला. शहरातील फळबाजारात फळांची पुरेशी आवक झालेली नसल्याने उपलब्ध फळांची चढ्या दराने विक्री होत असल्याचे चित्र भद्रकाली फळबाजारात शुक्रवारी बघायला मिळाले.रमजान महिना तसेच दाट लग्नतिथी असल्याने पालेभाज्या उपलब्ध होत नसतानाच उपवासासाठी आणि समारंभात कोशिंबिरीसाठी किंवा सजावटीसाठी फळांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना प्रत्यक्षात मात्र शहरातील बाजारपेठेत फळांची उपलब्धता नाही तसेच अनेक फळविक्रेत्यांनी मुंबईहून शहरात फळे दाखल6 न झाल्याने आपली दुकाने बंद ठेवणेच पसंद केले. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईच्या बाजारपेठेतून नाशिकमध्ये विविध फळे दाखल होतात, परंतु शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आणि मालवाहतूक सेवा बंद असल्याने नाशिकमध्ये गुरुवारी फळांची आवक झाली नाही, शनिवारी (दि. ३) नव्याने बाजारपेठेत फळ दाखल झाली नाहीत तर नाशिकच्या फळबाजारात शुकशुकाट बघायला मिळेल असे फळ व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. उपवासाबरोबरच दाट लग्नतिथीमुळे फळांची मोठ्या प्रमाणात मागणी होत असली तरी प्रत्येक ग्राहकाला फळे मिळावीत आणि फळे नाशवंत असल्याने उपलब्ध फळांचे नुकसान होऊ नये यासाठी विक्रेत्यांनी फळांच्या विक्रीस प्राधान्य दिले आहे.