निफाड : तालुक्यातील सावरगाव येथे विहिरीत पडून कोल्ह्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सावरगाव येथील बाबाजी कुशारे हे शेतात वस्ती करून राहतात शुक्र वारी दुपारी २ वाजता कुशारे त्यांच्या विहिरीजवळ गेले असता विहिरीत त्यांना कोल्हा मृतावस्थेत दिसला. त्यांनी ही घटना सरपंच संजय कुशारे व ग्रामपंचायत सदस्य विनायक कुशारे यांना सांगितली. त्यांनी येवला वनविभागाला कळविले. वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक शेख हे तातडीने कुशारेंच्या शेतात पोहचले. ४५ फूट खोल असलेल्या विहिरीत पाणीही भरपूर होते. सावरगाव येथील ज्ञानेश्वर कुशारे विहिरीत उतरले. त्यांनी प्लॅस्टिक कॅरेटमध्ये मृत कोल्ह्यास ठेवले व इतरांनी दोरखंडाने कॅरेट ओढून विहिरीबाहेर काढले. सदर घटनेचा वनरक्षक टेकणर यांनी पंचनामा केला. (वार्ताहर)
विहिरीत पडून कोल्ह्याचा मृत्यू
By admin | Updated: July 16, 2016 00:47 IST