शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेतकºयांचा चक्काजाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:33 IST

पंचवटी : दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची वाहतूक करणाºया मालवाहू पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक शेतमाल तसेच वाहनाच्या टपावर बसलेल्या शेतकºयांमुळे वाहतूक शाखेच्या दोघा पोलीस कर्मचाºयांनी पिकअप अडवून चावी काढून घेतली़ यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी दिंडोरीनाका येथे हॉटेल गोंधळसमोर रस्त्यात वाहने उभी करीत चक्काजाम आंदोलन केले.शुक्रवारी दुपारी (दि.६) सव्वा वाजता इगतपुरी तालुक्यातील भरवीर ...

पंचवटी : दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची वाहतूक करणाºया मालवाहू पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक शेतमाल तसेच वाहनाच्या टपावर बसलेल्या शेतकºयांमुळे वाहतूक शाखेच्या दोघा पोलीस कर्मचाºयांनी पिकअप अडवून चावी काढून घेतली़ यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी दिंडोरीनाका येथे हॉटेल गोंधळसमोर रस्त्यात वाहने उभी करीत चक्काजाम आंदोलन केले.शुक्रवारी दुपारी (दि.६) सव्वा वाजता इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथील पन्नास ते साठ शेतकरी नेहेमीप्रमाणे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणत असताना आडगाव नाक्यावरून वाहतूक पोलिसांनी पिकअपचा पाठलाग केला व क्षमतेपेक्षा जास्त शेतमाल वाहनात भरलेला असून, टपावर शेतकरी बसलेले असल्याने कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली पैसे दिले नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी बाजार समिती प्रवेशद्वारावर अडवून एकनाथ झनकर या शेतकºयांच्या पिकअप (क्रमांक एम. एच. १५ बीजे ७०२८) चावी काढून घेतली त्यानंतर संतप्त झालेल्या पन्नास ते साठ शेतकºयांनी पालेभाज्या वाहने रस्त्यात उभी करून काहीकाळ चक्काजाम आंदोलन केले. चक्काजाममुळे दिंडोरीनाका ते पेठफाटा दरम्यान काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शेतकºयांनी चक्काजाम केल्याची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, शिवाजी आव्हाड, नवले आदिंनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शेतकºयांची समजूत काढली .