शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनची सुविधा, पण साठवणूक व्यवस्थेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 00:16 IST

दिंडोरी : तालुक्यातील वणी येथील ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजनने सुविधायुक्त अतिरिक्त नवीन कोविड कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, कक्षास ऑक्सिजन पुरवठ्यासाठी स्टोरेज सिलिंडर बसवलेला नसल्याने कोविड कक्ष कार्यान्वित होऊ शकलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील कोविड रुग्णांना उपचारासाठी इतरत्र धावाधाव करावी लागत आहे. सध्या ट्रामा केअरमध्ये ३० ऑक्सिजन बेडची सुविधा असून, सदर अतिरिक्त केंद्र कार्यन्वित झाल्यास अजून ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत.

ठळक मुद्देवणी ग्रामीण रुग्णालय : कोविड कक्ष सुरू न झाल्याने रुग्णांची धावाधाव

दिंडोरी : तालुक्यातील वणी येथील ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजनने सुविधायुक्त अतिरिक्त नवीन कोविड कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, कक्षास ऑक्सिजन पुरवठ्यासाठी स्टोरेज सिलिंडर बसवलेला नसल्याने कोविड कक्ष कार्यान्वित होऊ शकलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील कोविड रुग्णांना उपचारासाठी इतरत्र धावाधाव करावी लागत आहे. सध्या ट्रामा केअरमध्ये ३० ऑक्सिजन बेडची सुविधा असून, सदर अतिरिक्त केंद्र कार्यन्वित झाल्यास अजून ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत.दिंडोरी तालुक्यात कोविडबाधितांची वाढती संख्या चिंताजनक असून, दिंडोरी तालुक्यात सध्या वणी ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत ऑक्सिजन सुविधायुक्त तीस खाटांचा कोविड कक्ष सुरू करण्यात आला आहे, तर बोपोगाव येथील शासकीय आश्रमशाळेत सर्वसाधारण कोविड कक्ष सुरु आहे. मात्र, तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, हे कोविड कक्ष अपुरे पडत आहेत. विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मागील आठवड्यात दिंडोरी-पेठ तालुक्यातील आरोग्य विभागाचा आढावा बैठक घेऊन कोविड कक्षातील बेड वाढविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.दरम्यान, ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने वणी येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयाच्या जनरल कक्षात नव्याने ऑक्सिजन सुविधायुक्त तीस खाटांचा कोविड कक्ष सुरू करण्याबाबत निर्णय घेत, त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते.यासाठी कक्षात बेडसह ऑक्सिजन पुरवठा करणारी पाइप लाइन व अन्य पायाभूत व्यवस्था पूर्ण केली आहे. मात्र, ऑक्सिजन साठविण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर टँक बसवण्यात आलेले नसल्याने सदर कोविड कक्ष कार्यान्वित होऊ शकलेला नाही. तालुक्यातील कोरोनाबाधितांची रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने, जिल्ह्याच्या ठिकाणी व अन्य खासगी रुग्णालयात धावाधाव करावी लागत आहे.व्हेंटिलेटर नसल्याने गैरसोयवणी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा कोविड रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आली आहे. मात्र, येथे व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असून, रुग्णांची प्रकृती खालावल्यास रुग्णांना खासगी दवाखान्यात बेड साठी शोधाशोध करावी लागत आहे. वेळीच व्हेंटिलेटर न मिळाल्याने काही रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे, तसेच दिंडोरी हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू करण्याचीही मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल