शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पुन्हा एक फेसबुक हॅकिंगचा प्रकार

By admin | Updated: July 14, 2017 01:10 IST

नाशिक : व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल साइटवरील अकाउंट हॅक होण्याची घटना पुन्हा उघडकीस आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल साइटवरील अकाउंट हॅक होण्याची घटना पुन्हा उघडकीस आली आहे. एका तरुणाच्या फेसबुकवरून त्याच्या ६५६ मित्रांना ‘मोबाइल क्रमांकावर त्वरित रिचार्ज कर, कारण मोठ्या अडचणीत सापडलो’, असा संदेश गेला आणि काहींना शंका आली. त्यामुळे अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले.गेल्या आठवड्यामध्ये राजस्थान येथून एका हॅकरला पोलिसांनी अटक केली होती. त्याने महिलांचे सुमारे तीसहून अधिक अकाउंट हॅक केल्याचे समोर आले होते. या घटनेने शहर पोलीस चक्रावले होते. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने तज्ज्ञांच्या मदतीने तपासचक्रे फिरवून अखेर हॅकरच्या मुसक्या आवळल्या; मात्र शहरातील नेटिझन्सचे सोशल साईट्सवरील अकाउंटवर अद्यापही हॅकर्सची वक्रदृष्टी असल्याचे एका घटनेवरून स्पष्ट होत आहे. मंगळवारी (दि.११) मंगेश बाळू काटे यांच्या फेसबुक अकाउंटवरून त्यांच्या मैत्रीच्या यादीमधील जवळपास ६५६ मित्रांना ‘तातडीने रिचार्ज करा, मी अडचणीत आहे’, असा संदेश पाठविला गेला. काही मित्रांना शंका आल्यामुळे त्यांनी थेट मंगेशसोबत संपर्क साधून विचारले असता त्याने असा कुठल्याही प्रकारचा संदेश पाठविला नसल्याचा खुलासा केला. यावर मित्रांनी त्याला तुझ्या फेसबुक अकाउंटवरून सर्व मित्रांना असा लघुसंदेश गेल्याची कल्पना दिली. यावरून अकाउंट हॅकरने हॅक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मंगेश यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून अज्ञात हॅकरविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी हॅकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.