शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 21:21 IST

पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक सतराची पिळकोस ते कळवण या दहा किमीच्या रस्त्याची नुकत्याच झालेल्या पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता दिवसेंदिवस एका बाजूला अधिकच खचला जात असून खड्यांचे प्रमाण हि वाढत आहे. यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून या रस्त्यावर अनेक वाहनधारकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देपिळकोस : तात्काळ दुरुस्ती करून वाहतुक सुरळीत करण्याची मागणी

पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक सतराची पिळकोस ते कळवण या दहा किमीच्या रस्त्याची नुकत्याच झालेल्या पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता दिवसेंदिवस एका बाजूला अधिकच खचला जात असून खड्यांचे प्रमाण हि वाढत आहे. यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून या रस्त्यावर अनेक वाहनधारकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.पंधरा दिवस झालेल्या पावसाने राज्य महामार्ग स्तरावर खड्यांचे साम्राज्य होऊन रस्ता उखडला जात असून रस्त्याची पूर्णत: चाळण झालेली असल्याने पिळकोस ते कळवण हा दहा किमीचा रडाव्या बाजूचा अर्धा रस्ता पूर्णता: एका बाजूला एक ते दीड फुट खोल खचला गेल्याने वाहनधारकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. त्यात वाह्नाचे नुकसान तर होते परंतु या कसरतीत रस्तावर किरकोळ व लहान मोठे अपघात नित्याचे घडत एकेरी अपघातही घडू लागले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी पिळकोस, जुनी बेज, नवी बेज, भादवण, बगडू या रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांकडून होऊ लागली असून संबंधित बांधकाम विभागाने याकडे पुरपणे दुर्लक्ष केल्यामुळे नाहक कित्येक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.राज्य महामार्ग क्र मांक सतरा हा रस्ता ज्या वेळेस तयार झाला त्यावेळेस पिळकोस कळवण या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले. पिळकोस कळवण रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी जबाद्दार असून रस्त्याच्या कामाची विभागीय चौकशी होऊन दोषींवर दंडात्मक व कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शांताराम जाधव, राहुल सूर्यवंशी, उत्तम मोरे, राहुल आहेर, केवळ वाघ, दादाजी जाधव, सचिन वाघ, बुधा जाधव, रामदास आहेर, अभिजीत वाघ, दुर्गेश सूर्यवंशी, नानाजी मोरे, निखील जाधव, युवराज शिंदे, नंदू पवार, उत्तम बोरसे, भारत पवार, किरण सोनवणे आदींनी केली आहे.