शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी मोजण्याचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:27 IST

बदलत्या वातावरणामुळे पावसाचा मूळ स्वभावच बदलून गेल्याने ठराविक क्षेत्रात धोधो बरसणाऱ्या अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे निकष कसे पडताळून पहावेत, असा पेच जिल्हा प्रशासनालाही पडू लागला आहे. परंपरागत पावसाचे सर्व ठोकताळे लहरी पावसामुळे केव्हाच वाहून गेल्याने पावसामुळे होणाºया नुकसानीचे निकष लावताना प्रशासनाचीही दमछाक होताना दिसत आहे.

ठळक मुद्देपावसाचे बिघडले तंत्र ठराविक क्षेत्रातच पाऊस; मोजणी यंत्रणेच्याही मर्यादा

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे पावसाचा मूळ स्वभावच बदलून गेल्याने ठराविक क्षेत्रात धोधो बरसणाऱ्या अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे निकष कसे पडताळून पहावेत, असा पेच जिल्हा प्रशासनालाही पडू लागला आहे. परंपरागत पावसाचे सर्व ठोकताळे लहरी पावसामुळे केव्हाच वाहून गेल्याने पावसामुळे होणाºया नुकसानीचे निकष लावताना प्रशासनाचीही दमछाक होताना दिसत आहे.राज्यात यंदा सर्वत्र पावसाने कहर केला. अगदी मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रो शहरात आणि दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्येदेखील धोधो पाऊस बरसला. हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरवत राज्यातील सर्व धरणे भरून वाहू लागली आहेत. अगदी परतीच्या पावसानेदेखील धुमाकूळ घातला असून, आॅक्टोबरच्या अखेरच्या चरणातही पावसाने झोडपून काढले आहे. पडणाºया एकूण पावसावर आणि क्षेत्रानुसार नुकसानीचा अंदाज काढला जातो. परंतु पावसाचे एकूणच ताळतंत्र पाहता भरपाईसाठी अतिवृष्टीचा निकष लावण्याचे मापदंडदेखील पडताळून पाहण्याची वेळ आली आहे.हवामान खात्याच्या मानांकानुसार ६५ मि.मी.च्या पुढे पडणारा पाऊस अतिवृष्टी म्हणून गणला जातो. जिल्ह्यात जुलैमध्ये एकदा, आॅगस्टमध्ये तीनदा, सप्टेंबरमध्येही तीनदा आणि आॅक्टोबरमध्ये दोनदा अतिवृष्टी झाली. यामध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यांना मदत करण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. काहींना मदतही करण्यात आली आहे. शासकीय नियमाप्रमाणे एकाच दिवशी अथवा ठराविक काळात ६५ मि.मी. पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी असले संबोधले जाते किंबहुना अशावेळी नुकसानीचे निकष लागू होतात. खरेतर भौगोलिकदृष्ट्या किती क्षेत्रावर ६५ मि.मी. मीटरच्या पुढे पाऊस झाला याचे मोजमाप करण्याचे तंत्रच कार्यान्वित नाही किंबहुना त्याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही. जिल्ह्यात सर्कल लेव्हलखाली अतिवृष्टी मोजण्याचे परिमाण नाही. त्यामुळे अतिवृष्टी मोजण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.भरपाईचा पेच : पावसाची विषमताएका सर्कलच्या क्षेत्रात ८ ते १० गावे येतात. परंतु या सर्वच गावांमध्ये पाऊस होतो असे नाही तर एखाद्या गावातच तास-दीडतास धुवाधार पाऊस होतो आणि तेथेच नुकसान होते. त्या एका गावातील पावसाच्या नुकसानीसाठी अतिवृष्टीचा निकष लावणे कठीण होते. संपूर्ण सर्कलचा पाऊस मोजला जातो तेव्हा सरासरी ३० ते ४० मि.मी. इतकाच पाऊस मोजला जातो. अशावेळी भरपाई देणार कशी, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयRainपाऊसfloodपूर