शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा आगाराकडून विद्यार्थ्यांना जादा बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:07 IST

देवळा : शालेय विद्यार्थ्यांसाठी जादा बस मिळावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पिंपळगाव (वा.) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले. बुधवार, दि. १ आॅगस्टपासून सटाणा आगाराने विद्यार्थ्यांसाठी जादा बससेवा सुरू केली. यामुळे पिंपळगाव (वा.) येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली असून, या जादा बसचे पूजन करून वाहक व चालकाचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देपिंपळगाव (वा.) : गैरसोय दूर झाल्याने समाधान; मंडळाकडून तातडीने दखल

देवळा : शालेय विद्यार्थ्यांसाठी जादा बस मिळावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पिंपळगाव (वा.) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले. बुधवार, दि. १ आॅगस्टपासून सटाणा आगाराने विद्यार्थ्यांसाठी जादा बससेवा सुरू केली. यामुळे पिंपळगाव (वा.) येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली असून, या जादा बसचे पूजन करून वाहक व चालकाचे स्वागत करण्यात आले.देवळा येथे शिक्षणासाठी येणाऱ्या पिंपळगाव (वा.) येथील ७० ते ८० विद्यार्थ्यांना सकाळी शालेय वेळेत येणाºया सटाणा आगाराच्या बसमध्ये जागा मिळत नसल्याने पैसे खर्च करून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक व शैक्षणिक नुकसानीबरोबरच मनस्ताप सहन करावा लागत होता. यामुळे विद्यार्थीवर्ग त्रासून गेला होता. विद्यार्थ्यांच्या अभिनव आंदोलनाला यश विद्यार्थ्यांनी सटाणा आगाराकडे वेळोवेळी जादा बसची मागणी केली होती; परंतु मागणी पूर्ण होत नसल्याने शेवटी विद्यार्थ्यांनी सोमवारी व मंगळवारी अभिनव पद्धतीने गाडीच्या टपावर ठिय्या आंदोलन केले होते.अखेर सटाणा आगाराने आंदोलनाची दखल घेत सकाळी ७ वाजता विद्यार्थ्यांसाठी जादा बस पाठविल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच नदीश थोरात यांच्या हस्ते चालक व वाहकाचा सत्कार करण्यात आला.