शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाकडून मतदार डाटा एंट्रीला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:08 IST

निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात सप्टेंबर ते आॅक्टोबरअखेर राबविलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार यादीत नव्याने नाव नोंदविलेल्या मतदारांची आयोगाच्या वेबसाइटवर आॅनलाइन नावनोंदणीचे काम राज्यात युद्धपातळीवर सुरू असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून आयोगाचे सर्व्हर डाऊन झाल्याने कामकाज ठप्प झाले.

नाशिक : निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात सप्टेंबर ते आॅक्टोबरअखेर राबविलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार यादीत नव्याने नाव नोंदविलेल्या मतदारांची आयोगाच्या वेबसाइटवर आॅनलाइन नावनोंदणीचे काम राज्यात युद्धपातळीवर सुरू असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून आयोगाचे सर्व्हर डाऊन झाल्याने कामकाज ठप्प झाले. परिणामी मुदतीत डाटा एंट्री होणे शक्य नसल्याचे पाहून निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीला यंदा अधिक महत्त्व असून, सप्टेंबर ते आॅक्टोबर अखेर संपूर्ण देशात राबविलेल्या या मोहिमेला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी करण्यात आल्यामुळे येत्या निवडणुकीत मतदारांची संख्या कमालीची वाढलेली असेल. मतदारांची छायाचित्रासह अद्ययावत यादी जानेवारी महिन्यात आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येईल. तत्पूर्वी ज्यांनी नव्याने नाव नोंदविले अशांची नोंद आयोगाच्या वेबसाईटवर करणे बंधनकारक आहे. पहिल्या टप्प्यात डाटा एंट्री आॅपरेटरकडून मतदारांच्या अर्जांची छाननी होऊन त्याच्या नावाची नोंद झाली असली तरी, त्यानंतर तीन टप्प्यात अधिकाºयांकडून प्रत्येक मतदाराच्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. अंतिम टप्प्यात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाºयांमार्फत मतदारांची नावे आयोगाला पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतरच आयोगाच्या मतदार यादीत त्यांची नावे समाविष्ट केली जातील. परंतु सध्या दुसºया व तिसºया टप्प्याचे काम सुरू असतानाच, गेल्या तीन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे सर्व्हर डाऊन झाल्याने नाशिकसह संपूर्ण राज्यातील कामकाज ठप्प झाले. तीन दिवसांत होणारे कामकाज साहजिकच लांबणीवर पडले आहे.ओळखपत्रही तयार करणारराज्यातील बहुतांशी जिल्ह्यांची ५० टक्के कामे अपूर्ण असून, आयोगाने नोव्हेंबरअखेर डाटा एंट्रीचे काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. सद्यस्थिती पाहता, येत्या दोन दिवसांत अपूर्ण काम पूर्ण करणे शक्य नसल्याने आयोगाकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत वाढवून दिली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एकीकडे नव मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्याबरोबरच अशा मतदारांचे निवडणूक ओळखपत्रही तयार केले जाणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय