शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या मतदार यादीला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:28 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोषामुळे ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या अडचणींबाबत अनेक जिल्ह्यांमधून तक्रारी वाढल्यामुळे शुक्रवारी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. संगणकीय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या अडचणींचा विचार करता निवडणूक अधिकाºयांनी हस्तलिखित याद्या तयार करून त्या जाहीर करण्यासही आयोगाने मुभा दिली आहे.

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोषामुळे ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या अडचणींबाबत अनेक जिल्ह्यांमधून तक्रारी वाढल्यामुळे शुक्रवारी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. संगणकीय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या अडचणींचा विचार करता निवडणूक अधिकाºयांनी हस्तलिखित याद्या तयार करून त्या जाहीर करण्यासही आयोगाने मुभा दिली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान मुदत संपणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या जाहीर करण्याचे आदेश दिले होते. आयोगाच्या पहिल्या आदेशानुसार १८ एप्रिल रोजी याद्या जाहीर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाºया संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे प्रारूप यादी जाहीर करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.  ज्या ग्रामपंचायतीच्या याद्या जाहीर करण्यात येणार आहेत, त्या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी मतदारांच्या नावाव्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यातील मतदारांची नावे त्यात समाविष्ट होण्याचे प्रकार राज्य आयोगाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होत असल्याने याबाबत आयोगाकडे तक्रार केली असता आयोगानेही दोष मान्य करून २० एप्रिल रोजी प्रारूप मतदारयाद्या जाहीर करण्याची मुदत वाढवून दिली. तथापि, सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोष दूर होऊच शकला नाही. त्यामुळे गुरुवारी दिवसभर निवडणूक अधिकाºयांनी हरतºहेचे प्रयत्न केले. परंतु त्यातील दोष दूर झाले नाहीत. शनिवारी जाहीर होणाºया मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि. २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून, दि. २७ एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.हस्तलिखित याद्या जाहीर करण्याची मुभाआयोगाकडून संगणकीय प्रणालीच्या माध्यमातूनच मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सक्तीच्या सूचना असल्यामुळे निवडणूक अधिकारीही पेचात सापडले होते. शुक्रवारी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यासाठी अधिकाºयांचा खटाटोप सुरू असताना आयोगाने तिसºयांदा मतदार यादीचा फेर कार्यक्रम जाहीर केला. त्यात ज्या ग्रामपंचायतींच्या संगणकीय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात तांत्रिक अडचणी येत असतील त्या ग्रामपंचायतीच्या हस्तलिखित मतदार याद्या जाहीर करण्याची मुभा दिली असून, अशा याद्या आता शनिवारी (दि. २१) प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत