शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा बनाव उघड; ‘त्या’ विवाहितेचा खून विहितगाव येथील घटना : सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:34 IST

नाशिकरोड : विहितगाव येथील विवाहितेने आत्महत्या नव्हे तर तिचा खून झाल्याचा प्रकार न्यायवैद्यक तपासणीत उघड झाला आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी गुन्हा दाखल गळा आवळून तोंड दाबून खून केला

नाशिकरोड : विहितगाव येथील विवाहितेने आत्महत्या नव्हे तर तिचा खून झाल्याचा प्रकार न्यायवैद्यक तपासणीत उघड झाला आहे. याप्रकरणाचा पोलिसांनी अधिक तपास केला असता चारित्र्याचा संशय घेऊन पती व नातेवाइकांनी गळा आवळून खून केल्याची बाब समोर आल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विहितगाव हांडोरे मळा येथील विवाहिता साक्षी उल्हास हांडोरे (वय ३४) हिने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मयत साक्षी हिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट झाले होते. याप्रकरणी साक्षी हिचा भाऊ सुनील बळवंत कौठे, रा. नरहरीनगर दसक जेलरोड याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, साक्षी हिचा २००६ मध्ये उल्हास हांडोरे यांच्याशी विवाह झाला असून, त्यांना दोन मुले आहेत. साक्षी अशोका स्कूलमध्ये सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत होती. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपूर्वी पती उल्हास हांडोरे व त्याच्या नातेवाइकांनी मिळून साक्षी हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून तोंड दाबून खून केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित उल्हास यास शुक्रवारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.न्यायवैद्यक विशेषज्ञांमुळे खुनाची उकलपत्नी साक्षी हांडोरे हिने गळफास घेतल्याचा बनाव तिचा पती उल्हास याने केला होता़ मात्र, जिल्हा रुग्णालयातील न्यायवैद्यक विशेषज्ञ डॉ़ आनंद पवार व डॉ़ धूम यांना शवविच्छेदन करताना विवाहितेची आत्महत्या नसून खून केल्याचे आढळून आल्याने त्यांनी शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण नमूद करून पोलिसांना माहिती दिली़ यानंतर पोलिसांनी उपनगर पोलीस ठाण्यात पती व नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल केला़