शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याच्या पूर्व भागात घडविले जाताहेत स्फोट

By admin | Updated: January 22, 2017 23:27 IST

घबराट : अज्ञात तेल कंपनीकडून चाचणी? प्रशासनही अनभिज्ञ

येवला : तालुक्याच्या पूर्व भागात तेल कंपनीच्या वतीने जमिनीत बोअरवेल घेऊन त्याठिकाणी स्फोट घडवून आणले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भूगर्भातील तेल व गॅस साठ्याच्या चाचणीसाठी हे स्फोट केले जात असून, यासाठी २७ गाड्या तालुक्यात आल्या आहेत. परवानगी न घेता नेमके कोणाच्या आशीर्वादाने हे घडत आहे याबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. दरम्यान, याबाबत कौठखेडे येथे शेती असलेले उमेशभाई निशिकांत पटेल यांनी पोलिसांकडे व तहसील कार्यालयाकडे तक्र ार केली आहे. खोदाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसल्याने तहसीलदार नरेश बहिरम यांनी गवंडगाव येथील पाच गाड्यांच्या चाव्या काढून घेत ही मोहीम थांबवली. दरम्यान, रविवारी रेंडाळे परिसरात या गाड्यांचा ताफा आला. शेतकऱ्यांनी याबाबत चौकशी केली केली असता परिसरात खनिज तेलाचे साठे कोठे आहेत याबाबत बोअर घेऊन शोधमोहीम चालू आहे. हे काम केंद्र शासनामार्फत चालू असल्याचे आणि जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन चालू असल्याची माहिती संबंधितांनी दिली.  कौठखेडा परिसरात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये या बोअरवेलच्या गाडी घालून शंभर फुटाच्या आसपास बोअर घेतली जात आहे. या बोअरवेलमध्ये मोठ्या क्षमतेच्या डिटोनेटरचे स्फोट घडवले जात आहेत. यामुळे अनेकांच्या बोअरवेलचे पाणी गायब झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. स्फोट करून नेमके काय पाहिले जात आहे हे शेतकऱ्यांना समजत नाही. एका तेल कंपनीकडून गोदावरी नदी ते नर्मदा नदी असा हा सर्व्हे असल्याचे बोलले जात असले, तरी अशी काही बोअरवेल करून स्फोट घडवण्याची परवानगी कोणाला दिल्याची माहिती वा आदेश महसूल प्रशासनाकडेही आलेले नाहीत. त्यात बोअरवेल घेणारे कामगार हे परप्रांतीय असून, त्यांना हिंदी भाषेतूनसुद्धा संवाद साधता येत नसल्याने व त्यांच्याबरोबर कोणीही जबाबदार अधिकारी नसल्याने, त्यात रेल्वे मार्गानजीकच्या परिसरामध्ये हे स्फोट घडवले जात असल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत उमेशभाई निशिकांत पटेल यांनी पोलिसांकडे व तहसील कार्यालयाकडे तक्र ार केली आहे. भाषेच्या अडचणीमुळे नेमके कोणत्या विभागाकडून हे काम चालू आहे, याची माहिती होत नसून या लोकांना असे काही करण्याचे आदेश नाशिक जिल्ह्यात नाही वा तशी त्यांना परवानगीही मिळालेली नाही. तरीही उमेश पटेल यांच्या शेतात या लोकांनी परवानगी न घेता उभ्या पिकात गाड्या घालून पाच ठिकाणी बोअर घेतले. गाड्या उभ्या केल्यानंतर रेल्वे मार्गानजीक डिटोनेटर फायरिंग करण्याचे चार्जिंग मशीन लावून शेतातील बोअरमध्ये स्फोट करण्याच्या प्रयत्नात हे लोक असल्याने रात्री उशिरा परत उमेश पटेल यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. (वार्ताहर)येवल्याच्या पूर्व भागात याबाबत काही शेतकरी संभ्रमात असल्याने ते कोणीही पुढे आले नाही. तहसीलदार नरेश बहिरम यांनी याठिकाणी पाहणी केली. परिसरात बोअर घेऊन त्यात स्फोट घडवल्याने आपल्या बोअरवेलचे वा विहिरींचे पाणी गायब होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.