शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिबेटियन मार्केटमध्ये गॅस गळतीमुळेच स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:10 IST

नाशिक : शरणपूररोडवरील तिबेटियन मार्केटमधील हॉटेलच्या गाळ्यात झालेला स्फोट हा गॅस गळतीतून झाल्याचा अहवाल पुणे येथील एनडीआरएफने दिला आहे़ त्यामुळे या स्फोटाबाबतचे गूढ संपल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी सांगितले़ शनिवारी (दि़७) पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास स्फोटाची घटना घडली होती़

नाशिक : शरणपूररोडवरील तिबेटियन मार्केटमधील हॉटेलच्या गाळ्यात झालेला स्फोट हा गॅस गळतीतून झाल्याचा अहवाल पुणे येथील एनडीआरएफने दिला आहे़ त्यामुळे या स्फोटाबाबतचे गूढ संपल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी सांगितले़ शनिवारी (दि़७) पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास स्फोटाची घटना घडली होती़पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तिबेटियन मार्के टच्या पश्चिमेकडील एका गाळ्यात झालेल्या स्फोटात नऊ गाळे व चायनीज गाड्यांचे नुकसान झाले होते़ शहरातील गुन्हेगारीचे केंद्र असलेल्या या ठिकाणी स्फोटाची घटना घडल्याने पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ तसेच पुणे येथील एनडीआरएफच्या पथकास तपासणीसाठी बोलावले होते़ या तपासी यंत्रणांना या ठिकाणी स्फोटक पदार्थ आढळून न आल्याने शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या़दरम्यान, एनडीआरएफ, फॉरेन्सिक एक्सपर्ट व बीडीडीएस यांनी केलेली पाहणी व निष्कर्ष तसेच पुण्यातील सूक्ष्म तपासणीनंतर दिलेला अहवाल यावरून गॅस गळतीतून हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे़पुणे येथील एनडीआरएफच्या पथकाने दिलेल्या अहवालातून तिबेटियन मार्केटमधील गाळ्यामध्ये झालेला स्फोट हा गॅस गळतीतून झाल्याचे समोर आले आहे़ पुणे येथील पथक माघारी गेले असून यामागे घातपाताची शक्यता नाही़- डॉ. राजू भुजबळ, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक