शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कळमदरी येथे चोर समजून जमावाकडून तरुणांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:57 IST

नांदगाव : मालेगाव येथून गिरणा धरणात छंद म्हणून मच्छिमारी करण्यासाठी आलेल्या शफीक हानिफ खान व त्याच्या सहा साथीदारांना कळमदरी येथे जमावाने चोर समजून जबर मारहाण केली. दोन दिवसांपूर्वी कळमदरी येथे चोरी झाली होती. या संदर्भात नांदगाव पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे नांदगाव पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल

नांदगाव : मालेगाव येथून गिरणा धरणात छंद म्हणून मच्छिमारी करण्यासाठी आलेल्या शफीक हानिफ खान व त्याच्या सहा साथीदारांना कळमदरी येथे जमावाने चोर समजून जबर मारहाण केली. दोन दिवसांपूर्वी कळमदरी येथे चोरी झाली होती. या संदर्भात नांदगाव पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादी सोबत मुकीम, नासीर, अस्सू, गुलाम, रसूल, कुबेर हे सर्व गिरणा धरणाजवळ मासेमारीला आले होते. मासेमारी केल्यानंतर ते कळमदरी येथे आले असता नागरिकांनी त्यांची विचारपूस केली; परंतु त्यांच्याशी काही एक न बोलता हे तरुण मोटारसायकलने परत गिरणा धरणाकडे गेले. धरणावरील मुख्यगेट बंद असल्याने तेथेच थांबले. यावेळी काही तरुणांनी या तरुणांना तेथे जाऊन हटकले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. या तरुणांना लाथाबुक्क्यांनी व काठीने जबर मारहाण केली गेली. त्यानंतर हे तरुण मालेगावी निघून गेले व मालेगाव येथे शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेतले व दुसऱ्या दिवशी याबाबतची तक्रार नांदगाव पोलिसात करण्यात आली. या प्रकरणी २० व्यक्तींवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसापूर्वी कळमदरी गावात चोरी झाली होती. त्यामुळे संशयाने अनोळखी तरुणांना कळमदरी गावातील नागरिकांनी विचारणा केली असता ते न बोलता तेथून निघून गेले.  त्यानंतर वरील प्रकार घडला. गिरणा धरणाची सुरक्षितता बेभरवाशाची असून, येथे कोणीही येऊन मासेमारी करणे. धरणाजवळ जाऊन थांबणे किंवा बेकायदेशीर धंदे करणे आदी वाढीस लागले आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणेने लक्ष घालणे गरजेचे झाले आहे.