शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या शाहीमार्गाचा होणार विस्तार

By admin | Updated: May 19, 2014 00:10 IST

सिंहस्थ चर्चासत्र : नाशिक वसंत व्याख्यानमाला

सिंहस्थ चर्चासत्र : नाशिक वसंत व्याख्यानमालानाशिक : इतर तीनही शहरांपेक्षा नाशिकमधील सिंहस्थ आव्हानात्मक असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते रुंदीकरणाबरोबरच मिरवणुकीच्या जुन्या शाहीमार्गाचे रुंदीकरण केले जाईल, अशी माहिती चर्चासत्रात देण्यात आली. नाशिक वसंत व्याख्यानमालेत आयोजित सिंहस्थ कुंभमेळा चर्चासत्रात ही माहिती देण्यात आली. या चर्चासत्रात विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, कुंभमेळा अधिकारी महेश पाटील, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांनी सहभाग घेतला. प्रारंभी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दृकश्राव्य माध्यमातून विविध विभागांच्या खर्चाबाबत माहिती दिली. त्यात चारही ठिकाणच्या कुंभमेळ्याचे नियोजन कसे असते याची माहिती देत नाशिकच्या कुंभमेळ्याचे वेगळेपण सांगितले. या महिन्याच्या शेवटी केंद्रीय स्तरावरून येणार्‍या आपत्कालीन नियंत्रण यंत्रणेच्या अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय २४०० कोटी रुपयांच्या खर्चात कोठेही निधीची कमतरता पडणार नसून सर्व विभागांना निधी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली.विभागीय आयुक्त एकनाथ डावले यांनी गोदा प्रदूषण रोखत ग्रीन कुंभ साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली. घाटाची लांबी वाढवून गर्दीवर नियंत्रण आणले जाईल, तसेच शहरातील मूलभूत प्रश्न सोडवून पायाभूत कामे उभारण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांनी शहरात येणार्‍या वाहतुकीचे नियोजन करण्याबरोबरच शहरात गर्दी आणि चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले. शहरात येणार्‍या वाहनांना शहराबाहेर थांबवून तेथून त्यांना आत सोडण्यासाठी महामंडळाच्या बसेसचा वापर केला जाईल आणि बॅरेकेडिंग लावून त्या गर्दीवरही नियंत्रण ठेवले जाईल, असे सांगितले. त्यासाठी स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक असल्याचेही डहाणे म्हणाले. महापालिकेचे शहर अभियंता उत्तम पवार यांनी शहरात येणार्‍या सुमारे तीन लाख साधूंसाठी राहण्याची तसेच पाण्याची सोय करण्याचे नियोजन तयार असल्याचे सांगितले. याबरोबरच शहरात त्या काळात पाणीपुरवठा कमी पडणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, असे सांगितले. त्या काळात सुमारे १६ जलकुंभ कार्यरत असतील, असे सांगून शाही मिरवणुकीसाठी पारंपरिक मार्गाचे रुंदीकरण आणि नव्या मार्गाचा वापर, असे दोन्ही पर्याय विचाराधीन असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी मंडलेश्वर काळे, रवींद्र देव यांच्यासह अनेक नागरिकांनी सूचना मांडल्या. शंकर बर्वे यांनी आभार मानले.