शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्सला मुदतवाढ

By admin | Updated: December 31, 2016 01:23 IST

ग्राहक डिश टीव्हीकडे : कंपन्यांचा सेवा देण्यास नकार

नाशिक : दूरचित्रवाणीवर केबलद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे डिजिटलायझेशन करण्याच्या अंतिम टप्प्याला ३१ मार्च २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे वृत्त असून, त्यामुळे ग्रामीण भागातील दूरचित्रवाणीधारकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने चार वर्षांपासून डिजिटलायझेशन म्हणजेच दूरचित्रवाणीला सेटटॉप बॉक्स बसवून घेण्याची सक्ती दूरचित्रवाणीधारकांना केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख महानगरांमध्ये त्याची सक्ती करण्यात आली, त्यानंतर टप्पाटप्प्याने संपूर्ण देशात ही मोहीम राबविण्यात येऊन शेवटच्या टप्प्यात ग्रामीण भागात सेटटॉप बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ अंतिम मुदत देण्यात आली होती. डिसेंबर अखेर नागरिकांनी सेटटॉप बॉक्स बसवून घेण्याबाबत वारंवार शासनाकडून तसेच केबल कंपन्यांकडून केले जात होते. ३१ डिसेंबर नंतर म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सेटटॉप बॉक्स न बसविलेल्या दूरचित्रवाहिन्यांवर कोणतेही कार्यक्रम प्रसारित होऊ शकणार नसल्याचेही सांगण्यात आल्याने, डिसेंबर महिन्यात जिल्ह्णातील ग्रामीण भागात राहणाऱ्या सहा लाख, ६३ हजार ९५१ कुटुंबीयांपैैकी केबल असलेल्या ३१ हजार ५९६ कुटुंबीयांनी तातडीने सेटटॉप बॉक्स बसविण्यास सुरुवात केली. डिसेंबर अखेर सोळा हजार ९१७ कुटुंबीयांनी सेटटॉप बॉक्स बसवून घेतले असून, अजून ४७ टक्के कुटुंबीयांनी सेटटॉप बॉक्स बसविलेले नाहीत.  सेटटॉप बॉक्स बसविण्यासंदर्भात देशभरात दूरचित्रवाहिन्यांचे उपग्रहाद्वारे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या कंपन्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवित ठिकठिकाणी न्यायालयात दावे दाखल केले आहेत, त्यावरील अंतिम सुनावणी अद्याप झालेली नाही. ३१ डिसेंबर २०१६ ही सेटटॉप बसविण्याची अंतिम मुदत देण्यात आल्याने या संदर्भात न्यायालयाने काही निर्णय दिल्यास त्यातून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. , शिवाय केंद्र सरकारने नोटाबंदी लागू केल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सेटटॉप बॉक्ससाठी आर्थिक चणचण भासत असल्याची बाब लक्षात घेऊन केंद्रीय प्रसारण खात्याने सेटटॉप बॉक्स बसविण्याला तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्याचा निर्णय २३ डिसेंबर रोजीच घेतला आहे. तथापि, अद्याप या संदर्भात शासकीय यंत्रणेला कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.