शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
2
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
3
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
4
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
5
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
6
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
7
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
8
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
9
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
10
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
12
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
13
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
14
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
15
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
16
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
17
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
18
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
19
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...

दिवाळी खरेदीला उधाण

By admin | Updated: October 17, 2016 01:06 IST

खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड : रांगोळी, आकाशकंदील, दिव्यांना मागणी वाढली

 नाशिक : हर्षोल्हासाचा दसरा सण आणि त्या पाठोपाठ येणारी दिवाळी म्हणजे संपूर्ण महिनाभराचा कालावधी आनंदाची पर्वणीच असते. अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली होती. प्रत्येकजण आपापल्यापरीने हा सण उत्साहात साजरा करतात. सण आता तोंडावर आल्याने सर्वांनाच दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या साहित्याची व किराणामालाची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. तर अनेकजण दिवाळीच्या खरेदीचे बेत आखत आहेत. शहरात परिसरातील विविध गावांतून ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने दरवर्षी येथील बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे मेनरोड, दहीपूल, कॉलेजरोड आदि विविध भागांतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. रंगीबेरंगी व विविध आकारातील दिवे आणि पणत्या बाजारपेठेत दाखल झाल्या असून, काही दुकानदारांनी मांडणीही सुरू केली आहे. गेल्या पंधरवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी शेतकरी खरिपाच्या हंगामासोबतच रब्बी हंगाम साधणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांनंतर शेतकरी कुटुंबामध्येही मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत साखरेचे भाव वाढले व डाळी, खाद्यतेल, रवा, मैदा यासह सर्वच मालाचे भाव कडाडल्याने यंदाच्या दिवाळीत ‘दिवाळं’ निघणार अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत असताना नागरिकांनी मात्र खरेदीची जय्यत तयारी केली असून, बाजारपेठाही ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. (प्रतिनिधी)