शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रामशेजसह जिल्ह्यातील दुर्गांचे अस्तित्वच धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 15:10 IST

जानोरी : किल्ले अजिंक्य रामशेजवर शनिवारी,रविवारी हजारो पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला बघण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने किल्ल्यावर काही टवाळ व उपद्रवीकडून किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तुना धोका निर्माण होत आहे. पर्यटकांना डोकेदुखी असलेला किल्ल्यावर टवाळांचा कायमच असणारा हैदोस थांबवावा याबाबत रामशेजवरील ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणासाठी तातडीने उपाय योजावे अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे व पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक आरती आळे, आशेवाडी ग्रामपंचायत कार्यालय यांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देकिल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेकडून निवेदन

जानोरी : किल्ले अजिंक्य रामशेजवर शनिवारी,रविवारी हजारो पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला बघण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने किल्ल्यावर काही टवाळ व उपद्रवीकडून किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तुना धोका निर्माण होत आहे. पर्यटकांना डोकेदुखी असलेला किल्ल्यावर टवाळांचा कायमच असणारा हैदोस थांबवावा याबाबत रामशेजवरील ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणासाठी तातडीने उपाय योजावे अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे व पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक आरती आळे, आशेवाडी ग्रामपंचायत कार्यालय यांना देण्यात आले आहे.किल्ले रामशेज नाशिकपासून अवघा १२ किलोमीटरवर पेठरोड लगत हा दुर्ग आहे. अवघ्या ३३० मावळ्यांनी ६ वर्षे रामशेजला वेढा देऊन बसलेल्या हजारो मुघली फौजेची दाणादाण उडवून रामशेज अजिंक्य राखला होता. याच पराक्रमाचे प्रतीक असलेला दुर्ग रामशेज अत्यंत महत्वाचा मूर्तिमंत वारसा आहे.किल्ल्यावरील दिवसागणिक वाढती गर्दी बघता किल्ल्यावर सुरक्षित पर्यटन व्हावे यासाठी अधिकृत गाईड नाही. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन पोलीस ही किल्ल्यावर नसतात, त्यामुळं असुरक्षित पर्यटकांना टवाळ मंडळींकडून त्रास होतो.किल्ल्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांची नोंदणी केली जात नाही. रामशेजवर कायमचा बंधुकंधारी वनपाल नेमावा, किल्ल्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंदणीसाठी वन विभागाने पायथ्याला चौकी उभारावी अश्या अनेक मागण्यांचे निवेदन शिवकार्य गडकोट संस्थेच्या वतीने संबंधितांना दिलेली आहे.दुर्ग रामशेजच्या तग धरून उरलेल्या वास्तू त्या किल्ल्याचे वैभव आहे. बागलाणचा ग्रीब्ज या इंग्रज अधिकाऱ्याने जिल्ह्यातील दुर्ग १८१८ नंतर सुरुंग लावून उध्वस्त केले. रामशेज ही त्यात उध्वस्त केला गेला. उरलेल्या वास्तू कित्येक दिवस दुर्लक्षित भग्न आहेत. प्रभू रामाची शेज असलेला रामशेज जीवापाड जपणारी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या अपार कष्टाने रामशेजसह जिल्ह्यातील कित्येक दुर्ग आज तग धरून आहेत. हातगडसाठी आमच्या पूर्वजांनी बलिदान दिले, मात्र त्यांच्या समाध्यांची स्थिती स्थानिकांच्या दुर्लक्षामुळे दुरवस्थेत आहे. हे दुर्ग वाचवणे सर्वांचेच कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने केलं पाहिजे.- मनोहर मोरे देशमुख (हतगडचे किल्लेदार गंगाजी मोरे देशमुख यांचे १३ वे वंशज) 

टॅग्स :FortगडGovernmentसरकार