शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

देहविक्रीचा व्यवसाय उघड : सात महिलांसह १५ जण ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई

By admin | Updated: May 29, 2015 00:04 IST

हॉटेल कुणालवर पोलिसांचा छापा

पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल कुणाल येथे देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याबाबत सांगली येथील सिस्टर फ्रिडम प्रोजेक्ट या संस्थेने केलेल्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमाराला हॉटेल कुणालवर छापा टाकून सात महिलांसह पंधरा संशयिताना ताब्यात घेतले आहे. हॉटेल कुणाल येथे कुंटणखाना चालविला जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमाराला गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा रचून तसेच बनावट ग्राहक पाठवून या कुंटणखान्यावर छापा टाकला. पोलिसांनी या ठिकाणाहून ४८ हजार रुपयांची रोकड तसेच जवळपास ४० निरोधची पाकिटे जप्त केली आहे. याबाबत माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील मिरज येथे सिस्टर फ्रिडम प्रोजेक्ट ही संस्था कार्यरत असून, या संस्थेच्या सदस्यांनी तक्रार केली होती. हॉटेल कुणाल येथे मुस्तफा शेख हा पीडित महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी हॉटेलात छापा टाकला असता हॉटेलातील विविध खोल्यांमध्ये काही महिला व ग्राहक आढळले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे रोक रक्कम मिळाली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कारवाई सुरू होती. पोलिसांनी या हॉटेलातून महिलांना देहविक्री करायला लावणारा संशयित मुस्तफा शेख याच्यासह बापू बाबूराव नवले, शांताराम विठोबा घुले, बाळासाहेब राजाराम जाधव, (चांदवड), वैभव जगन्नाथ मुरकुटे (लामखेडे मळा, दिंडोरीरोड), कल्पेश अनिल पाटील, (विडी कामगारनगर), शांताराम रामनाथ झाडे (अमृतधाम), मुस्तफा शेख यांचा मदतनीस रंजन विश्वंभर बराई, (पश्चिम बंगाल) अशा संशयितांसह देहविक्री करत असल्याच्या संशयावरून सात महिलांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या महिला मुंबई, वाशी, ठाणे, तसेच पुणे जिल्ह्यातील आहेत. (वार्ताहर)