शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांसाठी निलगिरी बागेत प्रदर्शन केंद्र

By admin | Updated: February 19, 2015 00:31 IST

मुंबईत बैठक : जऊळके वणीचाही पर्याय विचारात

नाशिक : उद्योजकांना विपणन आणि प्रचारासाठी कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी पंचवटीतील निलगिरी बाग येथील २६ एकर जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यास उद्योगमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे ही जागा शक्य न झाल्यास ओझरजवळ जऊळके वणी शिवारातील जागेचादेखील विचार होऊ शकतो. मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. निलगिरी बाग येथील जागा मिळावी यासाठी नाशिक महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार असून, त्यानंतर दुसऱ्या जागेचा विचार केला जाणार आहे.नाशिकमध्ये उद्योग व्यवसायाच्या प्रदर्शनासाठी शासकीय जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कायमस्वरूपी जागा मिळावी यासाठी उद्योजकांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत होते, त्याला आता मूर्त स्वरूप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्योग विभागाने प्रदर्शन केंद्रासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शासन तसेच औद्योगिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्लस्टर पद्धतीने हा प्रकल्प साकारण्याचा विचार आहे. यासंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीस उद्योग खात्याचे सहसंचालक प्रवीण दाबेराव, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, महापालिकेचे मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे, निमाचे अध्यक्ष रवि वर्मा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.पंचवटी विभागात निलगिरी बाग येथे असलेल्या जागेसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. ही जागा शहरात आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेली ही जागा ताब्यात घेण्यासाठी तसा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे ही जागा शक्य न झाल्यास जऊळके वणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या भूखंडाचा विचार केला जाणार आहे. प्रदर्शन केंद्रासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. यावेळी अन्य औद्योगिक विषयांवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत आशिष नहार, व्हिनस वाणी, मंगेश पाटणकर, मनीष कोठारी, ज्ञानेश्वर गोपाळे, सुरेश माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.