शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पेठ येथे मुदतबाह्य औषधे फेकली

By admin | Updated: January 10, 2016 22:59 IST

पेठ : जोगमोडी परिसरात टाकल्या हजारो बाटल्या

पेठ : तालुक्यातील सावळ घाटात मुदतबाह्य औषधांच्या दोनशे बाटल्या टाकून दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच दुसऱ्या दिवशी जोगमोडी रस्त्यावरील निर्जनस्थळी अशाच प्रकारे मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा टाकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे़एकीकडे शासकीय आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात औषध साठा कमी असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे आदिवासी भागातील कुपोषण नष्ट करण्यासाठी शासनाकडून पुरविण्यात आलेला टॉनिकचा साठा तीन वर्षांचा कालावधी लोटूनही वाटप न झाल्याने मुदत संपल्यावर बिनधास्तपणे टाकून दिला जात असल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाऊन कुपोषणाची समस्या जैसे थे राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ जोगमोडी परिसरात रस्त्यालगत टोनक्स सिरप व प्रुटिज सिरप हे कुपोषित बालकांना द्यावयाच्या औषधाच्या हजारो बाटल्या बेवारसपणे टाकून दिल्याचे दिसून आले़ ह्या बाटल्या औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथे उत्पादित झाल्या असून, जुलै २०१२ मध्ये उत्पादित केलेले हे औषध जून २०१५ मध्ये कालबाह्य झाले आहे. तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला असतानाही सदरचे औषध लाभार्थींना वाटप न करता मुदतबाह्य झाल्यावर बेवारसरीत्या टाकून दिले आहे़ सदरची औषधे कोणत्या विभागाकडून खरेदी करण्यात आली होती, याचा शोध घेण्याचे आवाहन आरोग्य विभागावर येऊन ठेपले आहे. आदिवासी बालकांना लाभापासून वंचित ठेवणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे़ (वार्ताहर)