शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक संदर्भातील कामावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 16:32 IST

कळवण - दशवार्षिक जनगणना व प्रत्यक्ष निवडणूक काम वगळता शिक्षकांना कोणतेही शाळाबाह्य काम देऊ नये असा शासननिर्णय असतांना व उच्च न्यायालयानेही शिक्षकांना बी.एल.ओ.कामाची सक्ती करु नये असा निकाल दिला असतांना कळवण तालुक्यातील शिक्षकांना कारवाईचा धाक दाखवून बी. एल.ओ. चे काम करावे लागत आहे. या कामांवर तालुक्यातील शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याचे निवेदन तालुक्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांतआधिकारी डॉ पंकज आशिया यांना दिले आहे.

ठळक मुद्दे कळवण :तालुक्यातील शिक्षकांचे निवेदन

विशेष मोहिमांना सुट्टीच्या दिवशी मतदार नाव नोंदणी करणे,मयत मतदार वगळणे,मतदार तपशील दुरु स्ती करणे,दिव्यांग मतदारांचा शोध घेणे,मतदान कक्ष सुविधा,घरोघरी मतदान स्लीपांचे वाटप करणे,वेळोवेळी मिटींगला उपस्थित राहणे अशा स्वरूपाची वर्षभर निरंतर चालणारी कामे बी. एल.ओ. ना करावी लागतात. आता हायब्रीड बी. एल.ओ. अ‍ॅप च्या माध्यमातून पुन्हा घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांची माहिती तपासून आधार कार्ड अपलोड करावे लागत आहे. ग्रामीण भागातील मतदार गावाबाहेर स्वत: च्या मळ्यात वास्तव्य करून राहतात. यावर्षी पावसाळा चांगला असल्याने बहुतांश रस्ते खराब झाले आहे . नाल्यात आतापर्यंत पाणी वाहत आहे. त्यामुळे त्या मतदारांपर्यंत पाच सात किलोमीटर दूर पायपीट करणे जिकीरीचे आहे.दुसरीकडे वर्गाचे अध्यापन,शाळेतील शालेय पोषण आहार,आॅनलाईन कामे,निष्ठा प्रशिक्षण,अध्यक्ष चषक स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन तंबाखू मुक्त शाळा, टॅग मिटींग,अशी शैक्षणीक कामे आहेत. याचा प्रत्यक्ष परिणाम शालेय कामकाज व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.बी. एल.ओ. कामासाठी इतर विभागांचे कर्मचारीही उपलब्ध असतांना जास्तीत जास्त शिक्षकांनाच या कामाची सक्ती केली जात आहे.काही महिला शिक्षकांना बी.एल.ओ चे काम दिले आहे.काही ठिकाणी तलाठी,ग्रामसेवक आहेत तेथील बी.एल.ओ. चे कामही काढून शिक्षकांनाच देण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.शिक्षकांची या कामातून मुक्तता करु न इतर विभागातील कर्मचाऱ्यांना सदर काम देण्यात यावे यासाठी शिक्षक समन्वय समिती कळवण च्या नेतृत्वाखाली बी.एल.ओ शिक्षकांनी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया , तहसीलदार बंडू कापसे साहेब,गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांच्याशी चर्चा करून येथून पुढे कळवण तालुक्यातील सर्व शिक्षकांचा बहिष्कार असल्याचे निवेदन दिले,व व्हाट्स अप ग्रुप बी.एल.ओ कळवण मधून ‘लेफ्ट’ होण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.याप्रसंगी शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय देशमुख,समितीचे अध्यक्ष संजय शिंदे,पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष निलेश भामरे, समितीचे जिल्हा नेते रामदास वाघ, आदिवासी शिक्षक संघटनेचे बाळू बागूल, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे बाबूलाल सोनवणे, बापू पगार,किरण आहिरे,वासुदेव देवरे,प्रशांत शेवाळे,प्रविण जाधव,सुनील आहेर,प्रविण भामरे,सुचिता पाटील व इतर बी.एल.ओ उपस्थित होते.