सिन्नर महाविद्यालयात आयोजित केलेल्या कारगिल विजय दिन कार्यक्रमात पवार बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. डी.एम. जाधव, सैनिक हवालदार समाधान भिसे, ला. नायक प्रवीण पवार, नायक सोमनाथ पवार, करण शिरसाठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व सैनिकांचा शाल, गुच्छ व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य प्रा. आर.व्ही. पवार यांनी आपल्या मनोगतात कारगिल युद्धाची पूर्ण शौर्यगाथा सांगितली. यावेळी हवालदार समाधान भिसे, ला. नायक प्रवीण पवार, नायक सोमनाथ पवार, करण शिरसाट यांनी आपापले अनुभव कथन केले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव यांनी कारगिल युद्धाच्या यशोगाथांमुळे आपल्या भारतीय सैनिकांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होऊन भविष्यातील होणाऱ्या युद्धांमध्ये त्यांना दिशा मिळेल. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने या सारख्या युद्धकथांचे वाचन करून सैन्याला धीर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ - वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. डी. के. खुर्चे यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. डी. एल. फलके यांनी आभार मानले.
फोटो -
सिन्नर महाविद्यालयात कारगिल विजय दिवसानिमित्त सैनिकांच्या सत्कारप्रसंगी उपप्राचार्य डी.एम. जाधव, आर.व्ही. पवार, समाधान भिसे, प्रवीण पवार, सोमनाथ पवार आदी.
270721\27nsk_17_27072021_13.jpg
सिन्नर महाविद्यालयात कारगील विजय दिवसानिमित्त सैनिकांच्या सत्कारप्रसंगी उपप्राचार्य डी. एम. जाधव, आर. व्ही. पवार, समाधान भिसे , प्रविण पवार, सोमनाथ पवार आदि.