शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

येत्या सात दिवसांत अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:14 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून बदलीपात्र अधिकाºयांच्या बदल्या २८ फेब्रुवारीच्या आत करण्याचे आदेश देणाºया निवडणूक आयोगाने पुन्हा एकवार आपला निर्णय फिरविला असून, आता २० फेब्रुवारीच्या आत राज्य सरकारने बदल्या कराव्यात तसा अहवाल २५ फेब्रुवारीपर्यंत केंद्रीय आयोगाला पाठवावे, असे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देमार्चच्या दुसºया आठवड्यात आचारसंहिता जारी होण्याची शक्यता

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून बदलीपात्र अधिकाºयांच्या बदल्या २८ फेब्रुवारीच्या आत करण्याचे आदेश देणाºया निवडणूक आयोगाने पुन्हा एकवार आपला निर्णय फिरविला असून, आता २० फेब्रुवारीच्या आत राज्य सरकारने बदल्या कराव्यात तसा अहवाल २५ फेब्रुवारीपर्यंत केंद्रीय आयोगाला पाठवावे, असे आदेश दिले आहेत. बदल्यांच्या घाईमुळे मार्चच्या दुसºया आठवड्यात आचारसंहिता जारी होण्याची शक्यता पहिल्या आठवड्यातच लागू होते काय अशी चर्चा होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीची गेल्या दोन वर्षांपासून प्रक्रिया पार पाडणाºया निवडणूक अधिकाºयांच्या ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून बदल्या करण्याचे धोरण आयोगाने स्वीकारले असून, त्यात प्रामुख्याने स्वजिल्हा असलेले, एकाच जिल्ह्णात चार वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले, ३१ मे २०१९ रोजी तीन वर्षे पूर्ण होणारे, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले अशा एक नव्हे तर अर्धा डझनाहून अधिक नियम व निकष तयार करून अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्णातील अधिकाºयांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असून, त्यातील काही नियम, निकष जाचक असल्याबद्दल अधिकाºयांचे आक्षेप कायम आहेत. त्यातील एक नियम गेल्या तीन वर्षांत ज्या अधिकाºयांनी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीचे काम केले असेल त्यांच्यादेखील बदल्या करण्यात याव्यात, अशा सूचना आयोगाने दिल्या होत्या. परंतु तीन वर्षांचा कालावधी नेमका कोणता याबाबत संभ्रम निर्माण झाला असता, काही राज्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण मागितले असता त्यावर आयोगाला पुन्हा माघार घ्यावी लागली व २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत निवडणुकीत अधिकाºयांचा सहभाग नको, असा निर्णय घ्यावा लागला आहे. आयोगाच्या सातत्याने बदलत जाणाºया भूमिकेचा मात्र अधिकाºयांना मनस्ताप सहन करावा लागत असून, दर दोन दिवसाआड बदल्यांच्या प्रस्तावात तसेच अधिकाºयांच्या नियुक्त्या, नेमणुकांमध्ये बदल करावा लागत आहे. गैरसोयीच्या बदल्या होण्याच्या भीतीने अधिकाºयांच्या मंत्रालयात ‘गाठीभेठी’ वाढल्या आहेत. त्यातून गैरप्रकाराला तसेच गैरसोयीच्या बदल्यांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या सात दिवसांत अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश दिल्यामुळे अधिकाºयांच्या बदल्यांबाबत आयोग करीत असलेली घाई पाहता, निवडणूक आचारसंहितेची घोषणा आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने यंत्रणा कामाला लागली आहे.