शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्डची अदलाबदल करुन सव्वा लाख हडपले

By admin | Updated: April 7, 2017 01:28 IST

सिन्नर : दोघा भामट्यांनी पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर ग्राहकाच्या खात्यातून १ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला.

सिन्नर : एटीएममधून पैसे काढल्याची स्लिप निघत नसल्याने आपण स्लिप काढून देतो, असा बहाणा करुन दोघा भामट्यांनी पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून या ग्राहकाच्या खात्यातून १ लाख १९ हजार रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी येथे महाराष्ट्र बॅँकेचे एटीएम आहे. मूळ संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथील रहिवाशी असलेले व हल्ली नोकरीनिमित्त वावीच्या गणेशनगर भागात राहणारे रमेश दादासाहेब वाळूंज हे सोमवारी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र बॅँकेच्या एटीएममध्ये आले होते. एटीएम मधून पैसे काढल्यानंतर पैसे काढल्याची स्लीप बाहेर आली नाही. यावेळी त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या दोघा अनोळखी युवकांनी पाठीमागे थांबून एटीएमचा पिनकोड गुपचूप पाहून घेतला. त्यानंतर या दोघा युवकांनी एटीएममधून स्लीप काढून देतो असे सांगत वाळूंज यांचे एटीएम आपल्या ताब्यात घेतले. हातचलाखी करत या दोघांनी वाळूंज यांच्या हातात सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाचे दुसरे एटीएम दिले. त्यानंतर हे दोघे पसार झाले.त्यानंतर या दोघा भामट्यांनी मंगळवारी व बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणावरुन वाळूंज यांच्या सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाच्या खात्यातून १ लाख १९ हजार रुपये काढून घेतले. मंगळवारी बॅँकेला सुट्टी होती. त्यानंतर बुधवारी सकाळपर्यंत या दोघा भामट्यांनी एटीएममधून पैसे काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाळूंज यांनी बुधवारी वावी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मुख्तार सय्यद अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर)