शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातून बेसुमार वाळूचा उपसा

By admin | Updated: June 5, 2016 00:09 IST

गिरणा : वाहनांची गर्दी वाढल्याने जत्रेचे स्वरूप; जिवीत, वित्तहानीचा धोका कायम

लोहोणेर : येथील गिरणा नदीपात्रातून दररोज बेसुमार वाळूचा उपसा होत असून, यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असल्याने पाण्याची पातळी चांगलीच खालावत चालली असली तरी या वाळू उपशाने मात्र चांगलाच जोर धरला असून, स्थानिक वाहनांबरोबर बाहेरील वाहने वाढल्याने येथे दररोज रात्री नदीपात्रात मोठी यात्रा भरते. यामुळे गिरणापात्रात जत्रा ट्रॅक्टर सतराऐवजी सत्तावन्न अशी म्हणण्याची वेळ आली असून, या जत्रेला अभय कोणाचे, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. गिरणा नदीपात्रातून दररोज बेसुमार वाळू उपसा होतो, हे सर्वश्रुत आहे. सायंकाळी ८ वाजेनंतर या जत्रेला सुरुवात होते. ती १२ तास सकाळी ८ वाजेपर्यंत चालू असते. तर पहाटे ६ वाजेपासून पुन्हा बैलगाडीच्या जत्रेला खऱ्याअर्थाने सुरुवात होते. या जत्रेला या वाळू तस्कराचा स्वत:चा असा खास बंदोबस्त असतो. त्यासाठी ते रात्रीचा-दिवस करीत असतात. त्यासाठी ते वेळप्रसंगी गस्तीसाठी येणाऱ्यानांही पहाटे ४ वाजेपर्यंत नदीपात्रात उभे करतात. तेही धंदा व्यवस्थित होत असल्याने इमानेएतबारे आपली हजेरी लावतात. या जत्रेला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या जत्रेचे दरही चांगलेच वाढले आहेत. ट्रॅक्टर सापडलेच तर आपले वाली लोकप्रतिनिधींना फोन करायला हजर असतात. त्यामुळे यांची दुकानदारी व्यवस्थित चालू आहे. या भाऊगर्दीत एखाद्या नवख्याने ट्रॅक्टर टाकलेच तर ही मंडळी फोन करून साहेबांना सांगतात. गिरणा नदीपात्रात लोहोणेर, ठेंगोडा, आराई , खमताने, सटाणा, देवळा, वासोळ, पिंपळगाव, वाखारी, खालप, दहीवड आदि गावांतून सुसाट वेगाने ट्रॅक्टर येतात. याच नादात काल रात्री वासोळ येथील एक ट्रॅक्टर चक्क लोहोणेर गावाजवळील खाटकी नाल्यात रात्री साडेअकराच्या सुमारास हूक तुटल्याने कोसळले. या अपघातात ट्रॅक्टरचे ही नुकसान झाले. तर ट्रॅक्टरवरील कोणाचे हात मोडले, कोणाच्या डोक्याला लागले. याची कुठे वच्चता होऊ नये म्हणून सदर ट्रॅक्टर रात्रीच सोयिस्कर ठिकाणी लपविण्यात आला. तर जखमींना रात्रीच दवाखान्यात हलविण्यात आले. ट्रॅक्टर जरी लंपास केला तरी जागेवर ट्रॉली सोडून जाण्याची वेळ या वाळू तस्करांवर आल्याने याची व्हायची तेवढी वाच्यता सगळीकडे झाली. (वार्ताहर)