शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग घेणार विद्यार्थ्यांची परिक्षा ! ; तपासणार सामान्य ज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 15:04 IST

 नाशिक : निवडणूक प्रक्रिया व मतदानाच्या पद्धतीसह एकूणच भारतीय समाजशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान आहे हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत तालुका पातळीवर परिक्षा घेतल्यानंतर जिल्हास्तरीय उत्तीर्ण निवडण्यात येणार आहे. आयोगाच्या या नवीन निर्णयामुळे मतदार ...

ठळक मुद्दे इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षा घेण्याचा निर्णय साधारणत: १४ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यासाठी परिक्षार्थी

 नाशिक : निवडणूक प्रक्रिया व मतदानाच्या पद्धतीसह एकूणच भारतीय समाजशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान आहे हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत तालुका पातळीवर परिक्षा घेतल्यानंतर जिल्हास्तरीय उत्तीर्ण निवडण्यात येणार आहे. आयोगाच्या या नवीन निर्णयामुळे मतदार जागृतीला हातभार लागण्यास मदत होणार आहे. निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षापासून मतदार जागृती मोहिम हाती घेतली असून, मतदानाचा टक्का वाढून लोकशाही अधिक सृदृढ करण्यासाठी मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती महत्वाची असल्याचे ओळखून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आता वयाच्या अठरा वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रिया, निवडणूक पद्धती, निवडणूक आयोग याबाबत आकर्षण निर्माण होण्यासाठी सामान्य ज्ञान चाचणी परिक्षा घेणाचे ठरविले आहे. साधारणत: १४ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यासाठी परिक्षार्थी ठरविण्यात आले आहे. या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्न पत्रिका असणार आहे, त्यासाठी ३९ प्रश्न आयोगाने निश्चित केले आहेत, मात्र स्थानिक पातळीवर त्यात निवडणूकी संदर्भात आणखी काही प्रश्न यंत्रणेला आवश्यक वाटत असतील तर प्रश्नांची संख्या वाढविण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे समाजशास्त्राबाबतचे ज्ञान जाणून घेणाºया प्रश्नांचा या प्रश्नपत्रिकेत समावेश आहे. मतदार नोंदणीसाठी किती वय असावे, त्यासाठी कोणता अर्ज भरावा, भारतात कोणती मतदान पद्धती आहे, ईव्हीएमचा पुर्ण अर्थ काय, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे, किती वर्षेवयोगटातील व्यक्ती उमेदवारी करू शकतो, लोकसभेची निवडणूक किती वर्षांनी, राज्यसभेची निवडणूक किती वर्षानंतर होते अशा अनेक प्रकारचे प्रश्न या परिक्षेत विचारण्यात येणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखेने निवडणूक आयोगाच्या या परिक्षेची तयारी सुरू केलीअसून, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एक किंवा दोन शाळेच्या विद्यार्थ्यांची परिक्षेसाठी निवड करण्यात येणार आहे. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर पुन्हा स्पर्धा परिक्षा होईल व त्यातून राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक