शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

बालकामगार निर्मूलनासाठी विविध आस्थापनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:02 IST

लहान मुलांना शालेय शिक्षण मिळायला हवे. संस्कार घडविण्याच्या वयातच त्यांना बालमजुरीला जुंपण्याचा प्रकार आजही घडत असून, बालमजुरी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी कृती दलाने वर्षभरात जिल्ह्यात ६७ धाडी टाकून ८१३ विविध आस्थापनांची तपासणी करून तीन बालकामगारांची सुटका केली व मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सातपूर : लहान मुलांना शालेय शिक्षण मिळायला हवे. संस्कार घडविण्याच्या वयातच त्यांना बालमजुरीला जुंपण्याचा प्रकार आजही घडत असून, बालमजुरी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी कृती दलाने वर्षभरात जिल्ह्यात ६७ धाडी टाकून ८१३ विविध आस्थापनांची तपासणी करून तीन बालकामगारांची सुटका केली व मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच १९४८ साली कामगार कायदे अस्तित्वात आले. या कायद्यात बालकांना कामावर ठेवू नये असाही कायदा आहे. तरीही सर्रास बालकांना बालमजूर म्हणून कामावर ठेवले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर बालमजुरी प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी भारत सरकारने १९८६ साली बालमजूर नियमन व निर्मूलन कायदा पारित केला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १९९५ पासून संपूर्ण देशात राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे, तर जागतिक श्रम संघटनेने (आयएलओ) देखील दखल घेत जागतिक स्तरावर हाच कायदा अंमलात आणला आहे. परंतु कायदे करूनही या बालमजुरी विरोधी कायद्याचे कटाक्षाने पालन होत नसून, कमी पैशात बालमजूर मुबलक उपलब्ध होत असल्याने त्यासाठी त्यांचा वापर करण्याकडे समाजाचा कल वाढला आहे.  राज्य सरकारने बालमजुरी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली धडक कृती दलाची समिती गठित केली आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार धाड पथकाची नियुक्ती केली जाते. या पथकामार्फत बालमजूर कामावर ठेवणाºया मालकावर पोलिसांत गुन्हे दाखल केले जातात.  बालकामगार निर्मूलन कायद्यानुसार संबंधित मालकाला ३ ते १२ महिन्यांचा तुरुंगवास आणि १० ते २० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. दुसºया वर्षी पुन्हा हाच गुन्हा केला तर ही शिक्षा दुप्पट होऊ शकते.फटाके उद्योगात सर्वाधिक बालमजूरकामगार कायद्यात बालमजुरी प्रथेचे उच्चाटन कायद्याचा समावेश असतानाही देशात सर्रास लहान मुलांना बालमजूर म्हणून कामावर ठेवले जात होते. त्यात विशेषत: तामिळनाडूतील शिवाकाशी फटाके उद्योगात बालमजूर कामावर ठेवण्याचे प्रमाण प्रचंड होते. फटाके उद्योगाला वारंवार लागणाºया आगीत हे बालमजूर मृत्युमुखी पडत असत. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्य सरकारला बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने २५ एप्रिल २००६ रोजी पुन्हा कठोर कायदा पारित केला.

टॅग्स :MIDCएमआयडीसी