शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By admin | Updated: May 6, 2017 23:07 IST

नांदगाव : येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही. जे. हायस्कूल, नांदगावच्या शतक महोत्सवास प्रारंभ झाला

लोकमत न्यूज नेटवर्क नांदगाव : येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही. जे. हायस्कूल, नांदगावच्या शतक महोत्सवास प्रारंभ झाला असून, त्याचे औचित्य साधून नांदगाव शहराच्या विद्यालयातील जे माजी विद्यार्थी आहेत व सध्या ते ज्येष्ठ नागरिक म्हणून समाजात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, अशा माजी विद्यार्थी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा नुकताच विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात विद्यालयातील १०० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिक म्हणजे एक अनुभवांचे पुस्तक असते, त्यांचे जीवनातील अनुभव देशासाठी, समाजासाठी आणि कुटुंबासाठी फार महत्त्वाचे असतात तेच अनुभव व त्यांचे मार्गदर्शन शाळेला व संस्थेला मिळावे हा हेतू ठेवून या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले गेले. यात अनेक ज्येष्ठांनी मार्गदर्शन केले व शाळेच्या विकासासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. व्ही. जे. हायस्कूल नांदगाव तालुक्याचा मानबिंदू असल्याचे सांगितले व अनेक गुणवान विद्यार्थी शाळेने घडविल्याचे सांगितले. अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेला व संस्थेला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक भैया चव्हाण यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी अनेक माजी शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कुदरत अली शहा, पदाधिकारी पद्माकर दुसाने, मेजर साळुंके, घेवरचंद लोढा, कुसुमताई सावंत, श्रावण आढाव, सोनवणे याचबरोबर मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद श्रीवास्तव यांनी केले. श्याम सोनस, भास्कर जगताप, गुलाब पाटील, विजय चव्हाण, जयंत निकम, भास्कर मधे, चंद्रकांत दाभाडे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्र माचे नियोजन केले.