शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम’मुळे लोकशाही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:04 IST

नाशिक : लोकशाहीत जनतेच्या मतांचा सहभाग असतो, मात्र अलीकडच्या निवडणुका या जनतेचा मतांवर नव्हे तर ईव्हीएम मशीनवर जिंकल्या जात असल्यामुळे लोकशाही व्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. निवडणुकीपूर्वीच किती जागा जिंकू शकतो, असे विधान भाजपकडून केले जात असल्याने त्यांना जनतेच्या मतांपेक्षा ईव्हीएमवर विश्वास असल्याचे सिद्ध होते, असा दावादेखील मेश्राम यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देवामन मेश्राम : बामसेफच्या राष्टÑीय अधिवेशनात ईव्हीएमवर घणाघात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकशाहीत जनतेच्या मतांचा सहभाग असतो, मात्र अलीकडच्या निवडणुका या जनतेचा मतांवर नव्हे तर ईव्हीएम मशीनवर जिंकल्या जात असल्यामुळे लोकशाही व्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. निवडणुकीपूर्वीच किती जागा जिंकू शकतो, असे विधान भाजपकडून केले जात असल्याने त्यांना जनतेच्या मतांपेक्षा ईव्हीएमवर विश्वास असल्याचे सिद्ध होते, असा दावादेखील मेश्राम यांनी यावेळी केला.‘बामसेफ’चे ३३वे महाराष्टÑ राज्य अधिवेशन सोमवारी (दि.१२) दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडले. यावेळी मेश्राम बोलत होते. अमरावती विभाग लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती, राष्टÑीय शीख मोर्चाचे हरविंदर सिंह खालसा, ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मारुती खैरे, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नंदा मथुरे, आंबेजोगाई मेडिकल कॉलेजचे डॉ. राजेंद्र अंकुशे, अखिल भारतीय पाथरवट समाजाचे सरचिटणीस हेमंत भोईर, डॉ. सूचित बागडे, रविराज राठोड उपस्थित होते.यावेळी मेश्राम यांनी ईव्हीएमच्या गैरप्रकाराला प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या कॉँग्रेसचादेखील छुपा पाठिंबा असल्याचा आरोप करताना ईव्हीएमचा लाभ हा भाजपा आणि कॉँग्रेसला होत असल्याचेही म्हटले. अधिवेशनाचे नियोजन नाशिकचे अ‍ॅड. सुजाता चौदांते, डॉक्टर विरोज दाणी, अक्षय अहिरे, एच. टी. फुले, सागर साळवे, भूषण पगारे, डॉ. प्रशिक धनसावंत, अविनाश पगार आदींनी केले होते. तीन सत्रांत विविध विषयांवर संवादपहिल्या सत्रात निवडणूक आयोग संविधानविरोधी कार्य करीत आहे का? २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी जनगणना व जातीनिहाय जनगणना याबाबत जनतेची मागणी व सरकारची जनविरोधी भूमिका यावर चर्चा झाली. दुपारच्या सत्रात मराठा आरक्षणाची चर्चा झाली़ सायंकाळच्या सत्रात बहुजन समाजातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या यावरही मंथन झाले़