शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मंडईपासून आरोग्य केंद्रापर्यंत सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:02 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेने सर्व भाजी मंडर्इंमध्ये दुकानदार आणि ग्राहक यांच्यात सीमारेषा आखली आहे, परंतु अनेक किराणा दुकानदार आणि औषध विक्रेत्यांसह अन्य नागरिकांनीदेखील सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला आहे.

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेने सर्व भाजी मंडर्इंमध्ये दुकानदार आणि ग्राहक यांच्यात सीमारेषा आखली आहे, परंतु अनेक किराणा दुकानदार आणि औषध विक्रेत्यांसह अन्य नागरिकांनीदेखील सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला आहे. त्यामुळेच आता ग्राहकांना किमान दीड ते दोन फूट अंतरावरूनच व्यवहार करावे लागत आहेत.कोरोना संसर्ग न होण्यासाठी बाधीत व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये यासाठी शासन आणि प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. हस्तांदोलन टाळण्यापासूनच दोन ते तीन फूट अंतरावर राहूनच बोलणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. महापालिकेने संचारबंदी काळात शहरातील ४७ ठिकाणी भाजीबाजाराच्या जागा निश्चित केल्या असून, त्याठिकाणी येणाऱ्या नागरिक आणि विक्रेते यांच्यात अंतर रहावे यासाठी खास रेषांची आखणीच करून दिली आहे. येणारे ग्राहक त्या रेषेच्या अलीकडूनच व्यवहार करीत आहेत. याशिवाय विक्रेतेदेखील मास्क लावत आहेत. त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिकांनी याबाबत दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे वैद्यकीय व्यावसायिक त्याचे पालन करीत असून, नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवेमध्ये प्रामुख्याने किराणा आणि औषधांच्या दुकानांचा समावेश आहे. या व्यावसायिकांनीदेखील सोशल डिन्सन पाळण्यासाठी खडूने रेषा मारून अंतर राखले जात आहे. महपाालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात ज्यांना अत्यावश्यक सेवेतील दुकान सुरू करायचे असेल त्यांना अशाप्रकारे रेषा आखण्याची सक्तीच केली असून त्यामुळे संबंधीत व्यवसायिक देखील त्याबाबत दक्षता घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार