शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी सर्वांनीच ठेवले देव पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:44 IST

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने सत्ताधाºयांनी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी बुधवारी (दि.२) दिवसभर पंडित कॉलनीतील एका बॅँकेत प्रगती पॅनलच्या निवड मंडळातील सदस्यांच्या मॅरेथॉन बैठका झाल्याचे समजते. अपात्र ठरविण्यात आलेल्या सर्वच उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने सत्ताधाºयांनी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी बुधवारी (दि.२) दिवसभर पंडित कॉलनीतील एका बॅँकेत प्रगती पॅनलच्या निवड मंडळातील सदस्यांच्या मॅरेथॉन बैठका झाल्याचे समजते. अपात्र ठरविण्यात आलेल्या सर्वच उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे.दरम्यान, विरोधी समाज विकास पॅनलने तालुकानिहाय बैठकांचा जोर सुरूच ठेवत बुधवारी मालेगाव व बागलाण येथे सहविचार सभा घेत सत्ताधारी पॅनलच्या कार्यपद्धतीवर टीका केली.नांदगावमधून प्रगती पॅनलसाठी इच्छुक असलेल्या दहा जणांच्या गटाने सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यासमोर विद्यमान संचालक दिलीप पाटील यांच्याऐवजी कोणा एकाला उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच नीलिमा पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नांदगावमधून सभासदांची सर्वाधिक मागणी विद्यमान संचालक दिलीप पाटील यांना असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर या दहा जणांच्या गटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे कळवणमधून इच्छुक असलेले विद्यमान संचालक रवींद्र देवरे यांनी उमेदवारी मिळाली तरच उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असून, उमेदवारी न मिळाल्यास शांत राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. बुधवारी पंडित कॉलनीतील एका बॅँकेत सत्ताधारी प्रगती पॅनलच्या निवड समितीतील सर्व सदस्यांची दिवसभर उमेदवारीबाबत खलबते चालली. यावेळी माजीमंत्री विनायक पाटील, सरचिटणीस नीलिमा पवार, रामचंद्र बापू पाटील, अ‍ॅड. शशिकांत पवार, श्रीराम शेटे आदींसह निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.सभासद नाही : पाटीलदिंडोरी तालुक्यातून प्रगती पॅनलकडून इच्छुक असलेले कृउबा सभापती दत्तात्रय पाटील यांनी आपण मविप्र व्यतिरिक्त कोणत्याही संस्थेचा सभासद नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपल्या जन्मासाठी आई-वडिलांनी करंजी (दिंडोरी) येथे नवस केल्यानेच तेथे शिक्षणसंस्था उभारून आपण त्या संस्थेला मदत करीत आलो आहोत. आपण या संस्थेचे सभासद अथवा संस्थापक नाही, असे दइात्रय पाटील यांचे म्हणणे आहे.न्यायालयात धावलवादाने उमेदवारी अर्ज बाद ठरविलेले सर्वच उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात गेल्याचे समजते. त्यात विद्यमान संचालक श्रीराम शेटे, नानासाहेब दाते, नंदा सोनवणे व गुलाबराव भामरे या सर्वच उमेदवारांनी लवादाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. याबाबत गुरुवारी (दि.३) सुनावणी होणार असल्याचे कळते.