शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वाहतूक ठेकेदार मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:44 IST

नाशिक : जिल्ह्णातील शासकीय गुदामांना अन्नधान्य महामंडळातून धान्य पुरविणाºया वाहतूक ठेकेदारांनी सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर अंग काढून घेतल्यानंतर खासगी वाहतूकदारांकरवी केल्या जाणाºया धान्य वाहतुकीसाठी अखेर पुरवठा खात्याला ठेकेदार मिळाला असून, चालू महिन्यापासून थेट रेशन दुकानदाराच्या दाराशी धान्य पोहोचविण्यास सुरुवात होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णातील शासकीय गुदामांना अन्नधान्य महामंडळातून धान्य पुरविणाºया वाहतूक ठेकेदारांनी सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर अंग काढून घेतल्यानंतर खासगी वाहतूकदारांकरवी केल्या जाणाºया धान्य वाहतुकीसाठी अखेर पुरवठा खात्याला ठेकेदार मिळाला असून, चालू महिन्यापासून थेट रेशन दुकानदाराच्या दाराशी धान्य पोहोचविण्यास सुरुवात होणार आहे.नाशिक जिल्ह्णात गेल्या पाच वर्षांपासून खासगी व्यक्तींकडून रेशनच्या धान्याची वाहतूक केली जात होती. त्यासाठी काही खासगी वाहने अधिग्रहित करण्यात आली, तर काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मदत घेण्यात आली. सुरगाणा येथील धान्य घोटाळ्यानंतर धान्य वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मनमाडच्या अन्नधान्य महामंडळातून निघणारे धान्य प्रत्यक्षात सुरगाणा शासकीय गुदामात न पोहोचता, धान्य वाहतूक ठेकेदाराच्या संगनमताने त्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याची बाब उघडकीस आल्याने पोलिसांत ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मात्र रेशनच्या धान्य वाहतुकीसाठी एकही ठेकेदार पुढे आला नाही. नाशिक जिल्ह्णात खासगी ठेकेदारामार्फत धान्य वाहतुकीसाठी दहा ते बारा वेळा निविदा मागविण्यात आल्या परंतु त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यामागे धान्य वाहतुकीसाठी मिळणारा वाहतूक दर कमी असल्याचे कारण दिले जात होते. या संदर्भात शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर काही महिन्यांपूर्वीच शासनाने धान्य वाहतुकीचे दर वाढवून दिल्याने पुरवठा विभागाने निविदा मागविल्या होत्या.गेल्या आठवड्यात पुरवठा विभागाने धान्य वाहतूकदारांच्या निविदा उघडल्या असता नऊ ठेकेदारांनी त्यासाठी तयारी दर्शविली, त्यापैकी मनमाड येथील ‘पाटील अ‍ॅण्ड पाटील’या वाहतूक कंपनीने कमी दरात शासकीय धान्य वाहतुकीची अनुमती दर्शविल्याने त्यांना ठेका देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आता मनमाड येथील अन्नधान्य महामंडळातून शासकीय गुदाम तसेच शासकीय गुदामातून थेट रेशन दुकानदाराच्या दाराशी धान्य पोहोच केले जाणार आहे. दुकानदारांना दिलासारेशन दुकानदारांना यापूर्वी शासकीय धान्याची गुदामातून स्वखर्चाने रेशन दुकानापर्यंत वाहतूक करावी लागत होती व नंतर पुरवठा विभागाकडून त्यांना वाहतुकीचा खर्च अदा केला जात; मात्र ते पैसेही वेळेवर मिळत नसल्याची तक्रार करीत रेशन दुकानदारांनी गेल्या अनेक वर्षांपासून द्वारपोच धान्य मिळावे अशी मागणी लावून धरली होती. सध्या सुरू असलेल्या त्यांच्या बेमुदत संपासाठी हेदेखील एक कारण होते. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.