शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज भरूनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर बोजा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST

मानोरी : वन टाइम सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ व्हावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून येवला तालुका तहसीलदार ...

मानोरी : वन टाइम सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ व्हावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून येवला तालुका तहसीलदार प्रमोद हिले यांना देण्यात आले आहे. राज्य सरकारने दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट योजना लागू केलेली असताना अनेक शेतकऱ्यांनी या वन टाइम सेटलमेंट योजनेत सहभागी होऊन नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले कर्ज भरलेले असताना देखील अद्यापही ही कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर या कर्जाच्या बोजाच्या नोंदी असल्याने इतर कोणत्याही बँका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून गेले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत एक रुपयादेखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक प्रमुख श्रावण देवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा तालुका अध्यक्ष मच्छिंद्र जाधव, अध्यक्ष किरण बारे, प्रभाकर गरूड आदी उपस्थित होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या कोणत्याही शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. लाखो रुपये खर्चून लावलेल्या टोमॅटोंना देखील कवडीमोल भाव मिळत असल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपले टोमॅटो रस्त्यावर टाकून देत, तर कुठे जनावरांना चारा म्हणून खाऊ घालत आपला रोष व्यक्त केला आहे. सध्याच्या परिस्थितीत टोमॅटोचा विचार केला असता मिळणाऱ्या भावातून साधा उत्पादन खर्च देखील फिटत नसून गाडीभाडे खिशातून देण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली असून, दुसरीकडे उन्हाळ कांद्याच्या दरात देखील सातत्याने घसरण होत असून, भाववाढीच्या अपेक्षेने ठेवलेला कांदा चाळीतच सडू लागला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. (३० येवला ३) वन टाइम सेटलमेंट कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना येवला तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी.