शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सत्तांतर होऊनही शासकीय समित्यांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 01:03 IST

नाशिक : राज्यात महाविकास आ‌घाडी सत्तेवर येऊन सुमारे सव्वा वर्षांचा कालावधी होत असला तरी अद्याप शासकीय समित्या आणि महामंडळांवर ...

ठळक मुद्देकार्यकर्त्यांत नाराजी : अशासकीय सदस्य नियुक्तीची मागणी

नाशिक : राज्यात महाविकास आ‌घाडी सत्तेवर येऊन सुमारे सव्वा वर्षांचा कालावधी होत असला तरी अद्याप शासकीय समित्या आणि महामंडळांवर अशासकीय सदस्य म्हणजेच कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने अस्वस्थता आहे. आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने तरी तातडीने नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. यासंदर्भात नाशिक शहर काँग्रेसचे माजी शहर उपाध्यक्ष कृष्णा नागरे यांनी काँग्रेस पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवले आहे. राज्यात सत्तांत्तरे झाली की नूतन सत्तारूढ पक्षाचे कार्यकर्त्यांना काही ना काही पदे मिळण्याची अपेक्षा असते. विशेषत: कार्यकर्त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना महामंडळे किंवा अन्य राज्य, विभाग आणि जिल्हास्तरीय समित्यांमध्ये स्थान मिळते. त्याच बरोबर अन्य कार्यकर्त्यांना अगदीच काही नसले तर किमान विशेष कार्यकारी अधिकारी पद तरी मिळते. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन सव्वा वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्याप अशा कोणत्याही महामंडळे किंवा समित्यांना मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तरी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी कृष्णा नागरे यांनी केली आहे.राज्यात सत्ता येऊन सव्वा वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही समित्यांची फेररचना झालेली नाही. त्यामुळे नेते तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी अशी स्थिती आहे. समित्यांच्या फेररचना झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण निर्मिती होऊ शकेल.- कृष्णा नागरे, माजी शहर उपाध्यक्ष कॉंग्रेस

टॅग्स :GovernmentसरकारPoliticsराजकारण