शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढल्यानंतरही काम रखडले

By admin | Updated: October 18, 2016 00:45 IST

जायगाव : धुळीच्या त्रासासह दळणवळणास अडथळा

जायगाव : धुळीच्या त्रासासह दळणवळणास अडथळानायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील रस्ता रुंदीकरणाच्या मार्गातील अतिक्रमणे हटविल्यानंतरही शिंदे-पाटपिंप्री रस्त्याचे काम रखडले आहे. गावातील रस्ता मोठ्या प्रमाणात खोदून ठेवल्याने धुळीच्या त्रास आणि अरुंद झालेला रस्ता यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे दळणवळणास अडथळे ठरत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.सहा महिन्यांपासून सुमारे १६ किलोमीटर रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीचे काम निर्मिती कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत सुरू आहे. अत्यंत संथ गतिने काम सुरू असल्याचा आरोप जायगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे. रुंदीकरणात अनेक ठिकाणी मुरुमाऐवजी माती वापरल्याने रस्त्यावर चिखलाचे प्रमाण वाढले असून, वाहने सरकण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. ठिकठिकाणी बनविलेले पर्यायी मार्गही कुचकामी बनल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे.महिनाभरापूर्वी जायगाव परिसरात या रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर गावातील मारुती मंदिर ते देशवंडी फाट्यापर्यंत रस्त्याची एक बाजू खोदण्यात आली. तथापि, त्यानंतर पुन्हा या रस्त्याकडे कोणीच फिरकलेले नाही. खोदकामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, दोन वाहने एकमेकांना पास होण्यात अडचणी येत आहे. अनेकदा नियंत्रण सुटून खड्ड्यांमध्ये वाहने अडकण्याचे प्रकार घडले आहेत. त्यात वाहनचालक जखमीही होत आहे. रस्त्याच्या लगत खोदलेले खड्डे पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे भरल्याने नव्याने येणाऱ्या प्रवाशांना रस्त्याचा नेमका अंदाज येत नाही, त्यामुळे खड्ड्यांमध्ये वाहने पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. (वार्ताहर)